nagpur metro announced big feast for Nagpurians on Celebration on Wheels nagpur news maharashtra marathi news



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur Metro नागपूर: नागपूर शहरात चारही भागात मेट्रो सेवा सुरु असून महामेट्रोमुळे नागपूरकरांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. सोबतच नागपूर मेट्रोच्या(Nagpur Metro)वतीने अनेक सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात. याच अनुषंगाने महा मेट्रोच्या वतीने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ उपक्रम राबविल्या जात आहे. ज्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद बघता महा मेट्रोने नागरिकांकरिता आणखी एक निर्णय घेत सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत रविवार दिवशी केवळ साडेतीन हजार रुपायांमध्ये एका तासाकरिता संपूर्ण मेट्रो ट्रेन बुक करण्याची योजना सुरू केली आहे. याचा कालावधी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजता पर्यंत असून अन्य दिवशी तसेच अन्य वेळेकरिता 5 हजार रुपये एवढे मोजावे लागणार आहे.

नागपूर मेट्रोची नागपूरकरांना मोठी मेजवानी

या सुविधेमुळे नागपूरकरांना मेट्रो मध्ये शैक्षणिक सहल, वाढदिवस, किंवा इतर कार्यक्रम साजरे करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांमध्ये सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक संपूर्ण मेट्रो ट्रेन बुक करत वाढदिवस, लग्न वाढदिवस आदी कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. या सुविधेला मिळणार प्रतिसाद लक्षात घेता नागपूर मेट्रोने यात आणखी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर शहराच्या बाहेरील जिल्ह्यातील गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या भागातून शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल देखील नियमित स्वरूपात येत असल्याची माहिती मेट्रोच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांची नागपूर मेट्रोला मिळणारी पसंती आणि लोकांचा वाढता कल बघता ही सुविधा देण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे.

अशी आहे बुकिंग प्रक्रिया

सेलिब्रेशन ऑन व्हील उपक्रम अंतर्गत ट्रेन बुकिंग प्रक्रिया एकदम सोपी आहे. कार्यक्रमच्या तारखेच्या एक महिना किंवा एक आठवड्या आधी सेलिब्रेशन ऑन व्हील ट्रेनची बुकिंग एक किंवा दोन तासाकरिता करू शकता. सविस्तर माहितीकरिता रवि वर्मा यांच्याशी मोबाइल क्र. 7827543131 या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.’सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ उपक्रमामध्ये 200 प्रवासी नेण्याची सोय असून नागपूर मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईनवर याचे आयोजन करता येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीकरिता संस्थेचे पत्र बंधनकारक आहे. 

सजावटी करिता एक तासाचा वेळ

मेट्रोमध्ये सजावटी करिता ट्रेन आयोजकाला एक तासापूर्वी स्टेशन वर उपलब्ध केल्या जाते. कार्यक्रमा करिता मेमबत्ती अथवा कुठल्याही प्रकारची आग लावण्याची पाबंदी आहे. नाश्ताकरिता आयोजकांना फ़ूड पैकेट आणि पानी बॉटल उपलब्ध करू शकतात. प्रवासा दरम्यान व्यवस्था सुरळीत राहण्याकरिता मेट्रोचे एक अधिकारी आणि सुरक्षा गार्ड तसेच सफाईकर्मी उपलब्ध असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Related posts