Uttarakhand Bus Accident, Breaking : उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना, वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, बचावकार्य सुरु – uttarakhand accident news kotdwar horrific accident bus carrying over 45 passengers fell in deep gorge( प्रगत भारत । pragatbharat.com)

डेहराडून : उत्तराखंडमध्ये ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. रिकनीखाल बिरोखाल रस्त्यावर ही घटना सीमडी गावाजवळ घडली. पौड ग्रहवाल जिल्ह्यातील ही घटना आहे. बस वऱ्हाडा घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून विस्तृत माहिती मिळणं बाकी आहे. आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे.

उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली असून वऱ्हाड घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. त्या बसमधून ४० ते ४५ लोक प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळतात स्थानिक प्रशासन आणि पोलीस दल घटनास्थळी रवाना झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बस खोल दरीत कोसळल्याने आणि अंधार असल्यामुळे बचाव कार्य करण्यात अडचण येत आहे. पौडी जिल्ह्यातील धुमाकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रिखनीखाल बिराखेल मार्गावर ही घटना घडली आहे. सीमडी गावाजवळून जात असताना ही बस दरीत कोसळली.

बस हरिद्वार जिल्ह्याच्या लालढांग येथून पौडीमधील बिरोमखाल गावात जात होती. चालकाचं बस वरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली.

रोसूने रडवले… भारताची चिंता वाढली, गोलंदाजांची धुलाई करत आफ्रिकेचा धावांचा डोंगर

कोटद्वार आणि पौडी पासून जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. ५०० मीटर खोल दरीत ही बस कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पौडीचे जिल्हाधिकारी विजय कुमार जोगदंडे एसडीएम स्मिता परमार घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

तोच थाट तोच उत्साह; कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा वैभवशाली इतिहास जाणून घ्या…

कोटद्वार येथून देखील काही पथकं बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत. घटनास्थळापासून ४० ते ५० किलोमीटर अंतरातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार दिलीप शेरावत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. बस खोलदरीत असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी विजयकुमार जोगदंडे यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटलंय. या घटनेत आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात आलं आहे. किती जण जखमी झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

राजस्थानात घडतंय बिघडतंय, गहलोत समर्थक मंत्र्याची पायलट यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी बॅटिंग

Related posts