harbajan singh trolls pakistan ali raza on virat kohli babar bumrah shahen rizwan dhoni combination ipl 2024 rcb mi csk marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

2024 IPL : 2008 मध्ये सुरु झालेली आयपीएल स्पर्धा जगभरात प्रसिद्ध आहेत.  पैसा, प्रसिद्धी अन् बरेच काही आयपीएलनं खेळाडूंना दिलेय. त्यामुळे जगभरातील प्रत्येक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायचं असतं. पाकिस्तानमधील खेळाडूंनाही भारतामध्ये खेळायचं असतं, पण दोन देशातील राजकीय संबंधामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये बंदी आहे. पकिस्तानमधील चााहत्यांनाही आपले खेळाडू आयपीएलमध्ये खेळावेत अशी इच्छा आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर तशी इच्छाही व्यक्त केली. नुकतेच पाकिस्तानच्या एका चाहत्यानं आपले खेळाडू आयपीएलमध्ये खेळावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्याला हरभजनसिंह यानं सडेतोड उत्तर दिलेय. 

हरभजन सिंह याचं पाकिस्तानी चाहत्याला सडेतोड उत्तर – 

अली रजा आलम यानं ट्वीट करत आगळीवेगळी इच्छा व्यक्त केली. त्यानं मॉर्फ केलेले फोटो पोस्ट करुन पाकिस्तान खेळाडू आयपीएलमध्ये खेळावेत अशी इच्छा व्यक्त केली. बाबर आझम विराट कोहलीसोबत आरसीबीमध्ये, शाहीन आफ्रिदी मुंबईच्या संघात बुमराहसोबत आणि मोहम्मद रिझवान धोनीसोबत चेन्नईच्या संघात … असं स्वप्न असल्याचं अली आलम यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय. त्याने मॉर्फ केलेले फोटोही पोस्ट केले आहेत. त्यावर अली यानं कॅप्शनमध्ये म्हटले की,…. प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांच्याचं स्वप्न आहे..  याच ट्वीटला भज्जीनं सनसनीत उत्तर दिलेय. 

हरभजन सिंह यानं ट्वीटरवर अली राजा आलाम याला प्रत्युत्तर दिलेय.  कोणताही भारतीय असं स्वप्न पाहात नाही. तुम्हीही अशी स्वप्न पाहणं साडून द्या…, असं भज्जीनं पाकिस्तनी नेटकऱ्याला सुनावलं. भज्जीनं दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. तेव्हा पाकिस्तानमधील अनेक खेळाडू आयपीएलच्या विविध संघाचे सदस्य होते. शाहीन आफ्रिदी, उमर गुल, शोएब मलिक यांच्यासह अनेक खेळाडू विविध संघाकडून खेळले आहेत. पण 2009 नंतर पाकिस्तान खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. 

दरम्यान, 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. धोनीचा सीएसके आणि विराट कोहलीचा आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना चेन्नईच्या मैदानात रंगणार आहे. आयपीएलच्या रनसंग्रामाला अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. 

आणखी वाचा :

IPL  2024 : धोनी म्हणजे विजयाची गॅरंटी, कॅप्टन कूल आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार; हिटमॅन, विराटचे आकडे किती ?

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts