बसपासह ‘या’ पक्षांना एकही पैसा मिळाला नाही; Electoral Bond संदर्भात नवा गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Electoral Bond : निवडणूक आयोगानं नुकतीच देशातील लोकसभा निवडणूक जाहीर केली असून, पाच टप्प्यांमध्ये पाच वेगवेगळ्या दिवशी ही निवडणूक पार पडणार असल्याचं जाहीर केलं. इथं निवडणूक जाहीर झाली आणि तिथं आचारसंहिता लागू झाली. असं असतानाच देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड (Electoral Bond) अर्थात निवडणूक रोखे आणि त्यामुळं समोर आलेल्या एका मोठ्या रकमेची. 

निवडणूक आयोगाकडून Electoral Bond संदर्भात आणखी नवी माहिती नुकतीच जारी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हीच माहिती एका लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आली होती. ज्यानंतर न्यायालयानंच माहिती जाहीरस करण्याचे निर्देश आयोगाला दिले. निवडणूक रोखेसंदर्भातील दुसऱ्या यादीतून ही 2019-20 दरम्यानच्या आर्थिक वर्षात, कोणत्या राजकीय पक्षाला किती आर्थिक पाठबळ मिळालं होतं याविषयीची माहिती समोर आली. 

आयोगानं जाहीर केलेल्या माहितीनुसार भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून  6,986.5 कोटी रुपये मिळाले, तर समाजवादी पक्षाला 14.05 कोटी रुपये मिळाले. अकाली दलाला 7.26 कोटी रुपये आणि AIADMK ला 6.05 कोटी रुये मिळाले.  नेशनल कॉन्फ्रंन्सला या प्रक्रियेत 50 लाख रुपयांचा फायदा झाला. ओडिशातील बीजू जनता दल या मुख्य पक्षाला 944.5 कोटी रुपये मिळाले, तर वजन श्रमिक रायथू कांग्रेस पार्टी (वायएसआर काँग्रेसला) 442.8 कोटी रुपये मिळाले. तेलुगू देसम पार्टीच्या वाट्याला 181.35 कोटी रुपये या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाली. 

‘या’ पक्षांना एकही पैसा नाही? 

बहुजन समाज पार्टी, सीपीआय (एम), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि ओवैसींच्या AIMIM च्या वतीनं देण्यात आलेल्या कागदोपत्री पुराव्यांनुसार या पक्षांना निवडणूक रोखे प्रक्रियेतून एक रुपयाही मिळाला नाही. दरम्यान, 2018 एप्रिल ते 2019 दरम्यानच्या काळासाठी जाहीर करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या माहितीमध्ये हा निधी देणाऱ्यांची नावं मात्र उघड करण्यात आलेली नाहीत. 

 

भाजपमागोमाग कोणाला मिळाला निधी? 

भाजपमागोमाग तृणमूल काँग्रेसला (TMC) निवडणूक रोखे स्वरुपात 1397 कोटी रुपये मिळाले. तर, काँग्रेसला एकूण 1,334.35 मिळाले. Electoral Bond मधून सर्वाधिक निधी मिळणाऱ्या पक्षांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर भारत राष्ट्र समिती (BRS) हा पक्ष असून, त्यांना 1,322 कोटी रुपये मिळाले. द्रविड़ मुनेत्र कड़गम (DMK) ला या प्रक्रियेतून 656.5 कोटी रुपये मिळाले असून यामध्ये लॉटकरी किंग सँटियागो मार्टिनच्या कंपनीचे 509 कोटी रुपये समाविष्ट आहेत. 

Related posts