[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हाय प्रोटीन डाएट
अंकुरने वजन कमी करताना दोन महत्वाच्या गोष्टींचा केला होता समावेश. उच्च प्रथिने आहार म्हणजे हाय प्रोटीन डाएट आवडीने शाकाहारी असलेल्या वारीकूला त्याच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्यास संकोच वाटत होता. त्याचे उच्च कार्ब-कमी प्रथिने बदलण्यासाठी, त्याने आपल्या आहारात पनीर, नट, मसूर, क्विनोआ, पीनट बटर आणि व्हे प्रोटीनचा आहारात समावेश केला.
इंटरमिटेंट फास्टिंग
वारिकू गेल्या आठ वर्षांपासून इंटरमिटेंट फास्टिंग करत आहेत. त्याने आपला 15-तासांचे इंटरमिटेंट फास्टिंग बदलून 18-तासांवर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कुठेही त्याला शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटले नाही.
खाण्यावर असे केले कंट्रोल
अंकुर सांगतो की, दिवसभरातून १५०० कॅलरी खाण्याचा माझा प्रयत्न असतो. आहारावर कंट्रोल करणे अत्यंत गरजेचे आहे. वेट लॉसचा पहिला आठवडा कठीण होता. पण त्यानंतर शरीराने देखील साथ दिली. एकेकाळी अंकुर पूर्ण पिझ्झा खायचा तेथे आता त्याला एक स्लाइस देखील पुरेसा होतो.
व्यायाम ठरतो महत्वाचा
अंकुर सांगतो की, वजन कमी करताना सर्वात महत्वाचा व्यायाम ठरतो. एक्सरसाइज अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. तुम्ही जो कोणता आहार घेता त्यामधून मिळणाऱ्या कॅलरीज बर्न करणे गरजेचे आहे.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]