देवघरात चुकूनही ठेवू नका ‘या’ देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा…| Vastu Tips Dont accidentally keep idols or photos of these gods and goddesses in the temple otherwise

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vastu Tips House Temple : आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार 33 कोटी देव असतात असा उल्लेख आहे. भारतीय घरात प्रत्येकाच्या घरात मंदिर किंवा देव्हारा असतो. त्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. भारतीय लोक मुलीच्या लग्नात तिला अन्नपूर्णा, गणपती, बाळकृष्ण आणि शिवलिंग देतात. आपल्या घरातील मंदिर कसं असावं, त्यात कुठल्या देवदेवतांचा वास असावा याबद्दल वास्तू शास्त्रात नियम सांगण्यात आलंय. (Vastu Tips Dont accidentally keep idols or photos of  these gods and goddesses in the temple otherwise )

मृत नातेवाईकांचे फोटो 

वास्तूशास्त्रानुसार पूजा स्थळी म्हणजे देव्हाऱ्यात मृत नातेवाईकांचे फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं. तुम्ही जर ही चूक केली असाल तर जीवनात समस्या निर्माण होतात असं म्हणतात.

या देवी-देवतांच्या मूर्ती ठेवू नका!

काली माता, राहू केतू आणि शनिदेवाची मूर्ती देवघरात चुकूनही ठेव नये असं म्हणतात. हे सर्व देव उग्र मानले जातात. त्यांच्या पूजेमध्ये काही चूक झाल्यास तुमच्यावर आर्थिक संकट कोसळतं असं वास्तूशास्त्र सांगतं. तुमच्या आयुष्यातील सुख समृद्धी नाहीशी होते.

नटराज मुद्रेची मूर्ती चुकूनही देवघरात ठेवू नये. कारण जेव्हा शंकर देव नाराज असतात तेव्हा ते तांडव करता, त्यामुळे अशी नाचणारी मूर्ती किंवा फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं आणि घरात मतभेद होतात. 

या देवाची मूर्ती आवर्जून ठेवा!

देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती आवर्जून ठेवा. कारण माता लक्ष्मी ही पैशाची कारक असते. तिच्या पूजेमुळे घरात सुख समृद्धीसह लक्ष्मीचा वास राहतो. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts