AAP On Congress:  …तर आम्ही राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार नाही; काँग्रेसला आपचा प्रस्ताव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
AAP On Congres:  लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी (15 जून) सांगितले की, लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र न आल्यास पुढच्या वेळी देशात निवडणुका होणार नाहीत, अशी शक्यता आहे.  मध्य प्रदेश आणि राजस्थान निवडणुकीबाबतही त्यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, दिल्लीत 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. जर काँग्रेस दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवणार नाही असे म्हणत असेल तर आम्ही राजस्थान आणि मध्य प्रदेशातही निवडणूक लढवणार नाही असेही आम्ही स्पष्ट करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

’आप’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून विरोधी पक्षांच्या भेटीगाठी सुरू आहेत. राज्यसभेत अध्यादेशाविरोधात एकत्र येण्यासाठी आवाहन त्यांच्याकडून सुरू आहे. तर, दुसरीकडे आपच्या नेत्यांकडून काँग्रेसवर टीकादेखील सुरू आहे.

काँग्रेसकडून ‘आप’ची नक्कल

सौरभ भारद्वाज यांनी ‘आप’च्या जाहीरनाम्याची कथितपणे कॉपी केल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटले की, देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसवर नेते टिकवण्याचे आव्हान नसून विचारांचे ही संकट आले आहे.
पाणी आणि वीज आणि महिलांसाठी मोफत बस प्रवासाशी संबंधित कल्याणकारी योजनांची अरविंद केजरीवाल आणि आपची खिल्ली उडवल्यानंतर काँग्रेस आमच्या जाहीरनाम्याची कॉपी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आधी थट्टा उडवली अन् आता त्याच योजना लागू

हिमाचल प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसने केजरीवाल यांच्या जाहीरनाम्याची कॉपी करत आपल्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश केला. पंजाबमध्ये आम्ही महिलांना मासिक भत्ता देऊ, असे सांगताच काँग्रेस पक्षाने आमची खिल्ली उडवली. त्यांच्या नेत्यांनी सांगितले की हे शक्य नाही आणि AAP फक्त लोकांना मूर्ख बनवत असल्याची टीका केली होती. परंतु नंतर काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये तशी घोषणा केली.

तर लोकसभा निवडणूक नाहीच….

2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट झाली नाही, तर पुढच्या वेळी देशात निवडणुका होऊ शकत नाहीत, असा दावाही सौरभ भारद्वाज यांनी केला. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आले तर ते संविधान बदलतील आणि ते जिवंत असेपर्यंत स्वतःला देशाचा राजा घोषित करतील अशी शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.

23 जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी ‘आप’च्या भूमिकेबाबत विचारले असता, त्यांनी म्हटले की, आता विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवली नाही तर 2029 मध्ये निवडणुका होण्याची शक्यता नाही.

[ad_2]

Related posts