PF Funda Public Provident Fund Should Invest Before 5 Month;मेहनतीने पीपीएफमध्ये गुंतवाल पण ‘ही’ 1 चूक करेल लाखोंचे नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

SIP Investment Stratergy: मुलाच्या जन्मासोबतच अनेकजण त्याच्या भविष्यासाठी आर्थिक प्लानिंग सुरु करायला सुरु करतात. असे केल्याने तरुण वयातील त्याच्या तमाम जबाबदाऱ्यांसाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही.आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत.तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि गरजेनुसार तुम्ही मुलासाठी गुंतवणूक सुरु करु शकता. तुमच्या बाळासाठी एक मोठा फंड गोळा करु इच्छित असाल तर म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरु शकतो.एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये अधिकाधिक रक्कम जोडू शकता. नुकतेच जन्माला आलेले तुमचे मुल 21 व्या वर्षी कसे करोडपती बनेल याबद्दल जाणून घेऊया. 

समजून घ्या फॉर्मुला 

21x10x21 हा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? या फॉर्मुला तुमच्या मुलाच्या जन्मासोबत सुरु होतो. म्हणजेच मुलाच्या जन्मानुसार एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक सुरु ठेवायची आहे. 10 चा येथे अर्थ 10 हजार रुपये असा आहे. म्हणजेच तुम्हाला मुलाच्या नावे 10 हजार रुपयांची मासिक एसआयपी सुरु ठेवायला हवी. एसआयपीद्वारे तुम्हाला किमान 12 टक्क्यांनी रिटर्न मिळतील असे मानले जाते.

बाळ कसे बनेल करोडपती?

तुम्ही या फॉर्मुलानुसार मुलांच्या नावे मासिक 10 हजार रुपयांची एसआयपी सुरु करु शकता. ही एसआयपी सलग 21 वर्षे सुरु ठेवायची आहे. 21 वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणुक 25 लाख 20 हजार इतकी झालेली असेल. एसआयपीचे सरासरी रिटर्न 12 टक्क्यांच्या हिशोबाने मोजले जाते. यानुसार मोजल्यास 88 लाख 66 हजार 742 रुपये व्याज मिळेल. 

अशा पद्धतीने तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि व्याज मिळून 21 वर्षानंतर तुमच्या मुलाकडे 1 कोटी 13 लाख 86 हजार 742 रुपये मिळतील. म्हणजेच 21 व्या वर्षी तुमचा मुलगा 1 कोटींचा मालक बनलेला असेल. या पैशातून त्याच्या भविष्यातील अनेक गरजा पूर्ण झालेल्या असतील. त्यामुळे मोठा होऊन तो तुम्हाला नक्की थॅंक्यू पप्पा म्हणेल. 

दरमहा 50 हजार कमावणारे सहज करु शकतात ही एसआयपी 

दर महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपी सुरु करणं कसं शक्य आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आर्थिक नियम असा सांगतो की, तुमच्या कमाईतील 20 टक्के कोणत्याही परिस्थितीत गुंतवून ठेवायला हवेत.

समजा तुम्हाला 50 हजार रुपये पगार असेल तर याचे 20 टक्के म्हणजे साधारण 10 हजार रुपये होतात. तुमच्या गरजा थोड्या नियंत्रणात ठेवलात तर 10 हजार रुपये मुलाच्या नावाने गुंतवू शकता. तुमचा पगार 50 हजारपेक्षा जास्त असेल तर मग तुम्हाला जास्त अडचण येणार नाही.

Related posts