Best Time To Drink A Water In A Day; दिवसभरात कोणत्यावेळी पाणी पिणे चांगले ज्याचे आरोग्याला होतात जबरदस्त फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​सकाळी यावेळी प्यावे पाणी

​सकाळी यावेळी प्यावे पाणी

सकाळी उठल्यावर तुमच्या शरीराचं खूप तासांच इंटरमिटेंट फास्टिंगमधून उभं राहतं. अशावेळी शरीराला आधार म्हणून सकाळी उठल्यावर पहिलं पाणी प्यावं. जमल्यास कोमट पाणी प्यायल्यास शरीराला फायदा होतो.

​जेवणाअगोदर प्या पाणी

​जेवणाअगोदर प्या पाणी

कोणतही मिल घेण्याअगोदर जर पाणी प्यायलात तर पोटाला खूप मोठा आधार मिळतो. महत्वाचं म्हणजे जेवणाअगोदर पाणी प्यायल्यास भूक क्षमते आणि जेवण कमी खाल्लं जातं. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

​(वाचा – Vitamin D च्या मदतीने Hrithik Roshan करतोय वेट लॉस, कसा होतो फायदा)​

​घाम येत असेल तर पाणी प्या

​घाम येत असेल तर पाणी प्या

खूप घाम येत असेल तर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण खूप घाम येत असेल तर शरीर डिहायड्रेट होतं. अशावेळी शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवण्यास पाणी पिणे गरजेचे आहे.

​मसाज केल्यानंतर पाणी प्या

​मसाज केल्यानंतर पाणी प्या

मसाज केल्यानंतर शरीरातील घाणी बाहेर फेकून देण्यासाठी तुम्हाला पाणी मदत करेल. तसेच मसाजमुळे थकवा आलेला असतो अशावेळी पाण्याने थोडा आराम मिळेल.

​(वाचा – पाण्यात हात ठेवल्यानंतर का येतात सुरकुत्या? याचे शरीराला होणारे 5 जबरदस्त फायदे)​

​आंघोळ करण्यापूर्वी प्या

​आंघोळ करण्यापूर्वी प्या

आंघोळीला जाण्यापूर्वी एक ग्लासभर पाणी प्या. यामुळे लो ब्लड प्रेशर राहण्यास मदत होते. अनेकदा आंघोळ करताना गरम पाणी आणि दरवाजा बंद असल्यामुळे अनेकांना सफोकेशनचा त्रास होतो. अशावेळी पाणी प्यायल्यास हायड्रेट राहणे गरजेचे आहे.

​झोपण्यापूर्वी पाणी प्या

​झोपण्यापूर्वी पाणी प्या

झोपायला जाण्यापूर्वी एक ग्लासभर तरी पाणी प्या. यामुळे रात्रभर तुमचं शरीर हायड्रेट राहिल. ७ ते ८ तासांच्या झोपेत शरीराला पाणी मिळत नाही. यामुळे अगोदरच पाणी पिणे झोपणे फायद्याचे ठरते.

​(वाचा – या १० पदार्थांमध्ये खच्चून भरलंय कॅल्शियम, म्हातारपणीही हाडे राहतील टणक)​

​व्यायामाच्या अगोदर-नंतर

​व्यायामाच्या अगोदर-नंतर

एक्सरसाइज करताना पाणी प्यायला नाहीत तरी देखील व्यायामाच्या अगोदर आणि नंतर पाणी प्या. व्यायाम करताना घामाद्वारे शरीरातील पाणी निघून जाते. अशावेळी तुम्ही व्यायामाच्या अगोदर आणि नंतर पाणी प्या. पण ते पाणी कायमच बसून प्यावे.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts