Durg Bus Accident Fatal accident in Chhattisgarh 15 people died in the bus accident

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Durg Bus Accident: छत्तीगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. यावेळी एक बस खाणीत कोसळली. या घटनेत 15 जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा एक बस या खाणीत कोसळली. त्यात बसलेल्या 15 कामगारांचा मृत्यू झाला. बसमध्ये 40 हून अधिक लोक होते. हे सर्व लोक जवळच असलेल्या डिस्टिलरी प्लांटमध्ये काम करायचे. 

सायंकाळी कामगार कंपनीच्या बसने घरी परतत असताना अचानक हा अपघात झाला. या अपघातात काही कामगार जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रपती मुर्मू, पीएम मोदी आणि सीएम विष्णुदेव साई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक (छावणी क्षेत्र) हरीश पाटील यांनी माहिती दिली की, कुम्हारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी गावाजवळ रात्री 8.30 च्या सुमारास हा अपघात घडला. दुर्ग जिल्ह्याचे एसपी जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास डिस्टिलरी कंपनीत काम करणारे कामगार शिफ्ट संपवून घरी जात होते. यावेळी दुर्घटनेत जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर जे गंभीर जखमींना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एसपीने सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 40 जणांनी भरलेली बस रस्त्यावरून घसरली आणि 40 फूट खोल खाणीत पडली. मुरम हा एक प्रकारची माती आहे, जी बांधकामासाठी वापरली जाते. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर रायपूर आणि भिलाईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय, दुर्ग, छत्तीसगड येथे झालेला बस अपघात अत्यंत दुःखद आहे. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

फॅक्ट्रीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा अपघात घडल्याची माहिती आहे. गंभीर जखमींना रायपूरला पाठवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले असून बस खदानीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related posts