UPSC Job IES ISS Post Vacant apply on upsconline Marathi News;केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com)

UPSC Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत वेळोवेळी विविध पदांची भरती जाहीर करण्यात येते. देशभरातील तरुण याची तयारी देखील करत असतात. या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी अंतर्गत इंडियन इकोनॉमिक सर्व्हिस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (ISS) ची 48 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

शैक्षणिक अर्हता

आयईएस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इकोनॉमिक्समध्ये मास्टर्स केलेलं असावं. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात. 

आयएसएस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लायड स्टॅटिस्टिक्समध्ये मास्टर्स केलेले असावे. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवारदेखील यासाठी अर्ज करु शकतात. 

इंडियन इकोनॉमिक सर्व्हिस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 तर कमाल वय 30 वर्षांदरम्यान असावे. 

अर्ज शुल्क

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज शुल्काबद्दल जाणून घ्या. जनरल, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून 200 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्ग आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्या. 

कसा कराल अर्ज?

तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशन करा. यूपीएससी आयईएस 2024  साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ओटीआर नंबर फॉर्म भरावा लागेल. यानंतर मागितलेली माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा. 

महत्वाच्या तारखा

10 एप्रिलपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 30 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. आयईएस आणि आयएएस पदासाठी 21जून 2024 रोजी परीक्षा होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Related posts