राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा

मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर प्रचंड मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन  मा. मुख्यमंत्री यांना  देण्यात आले होते. मात्र त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

आता त्यावर तातडीने कार्यवाही करावी यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने *गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी  सकाळी ११ वा. विधानभवन नागपूर* येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री मा. श्री.  बबनराव (नाना) घोलप यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन केले आहे.सदर मोर्चा *यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन त्यानंतर विधानभवन नागपूर* येथे जाईल. याकरीता जास्तीत जास्त संखेने समाजबांधवांनी मोर्चासाठी उपस्थित रहावे,ही नम्र विनंती !आपला नम्र,*डॉ.  शांताराम पां. कारंडे* प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य 

Related posts