Blood Clotting Sign That May Cause Heart Attack Avoid 5 Vegetables; संकेत जे सांगतात नसांमध्ये रक्त घट्ट होऊन साचतंय, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रक्त घट्ट होण्याचे कारण

रक्त घट्ट होण्याचे कारण

रक्त घट्ट होण्यामागे अनेक कारणं आहेत. हेल्थलाईनने दिलेल्या अहवालानुसार, काही आजार असे आहेत आणि काही गोष्टींची कमतरता यासह चुकीच्या सवयीदेखील कारणीभूत ठरतात. कॅन्सरग्रस्त व्यक्तींमध्ये रक्ताच्या गाठी लवकर होतात. तर प्रोटीन सी अथवा प्रोटीन S ची कमतरता, धुम्रपानसारख्या कारणांमुळेही रक्त घट्ट होते.

कमी तापमान कारणीभूत

कमी तापमान कारणीभूत

Heart.org नुसार, कमी तापमान त्या व्यक्तींसाठी अधिक धोकादायक आहे ज्यांच्या नसांमध्ये आधीपासूनच रक्त घट्ट असते. थंडीमुळे या नसा आखडतात, मात्र उन्हाळ्यात तितकाच त्रास होऊ शकतो जर तुम्ही सतत एसी मध्ये राहात असाल. नसा आखडल्यामुळे ब्लड प्रेशर वाढते आणि त्याचा परिणाम रक्त घट्ट होण्यावर होतो.

(वाचा – रेमो डिसुझाच्या पत्नीने ४० किलो केले वजन घटवले, १०५ किलो वजनच्या लिझेलचा डाएट प्लॅन)

रक्त घट्ट होण्याची लक्षणे

रक्त घट्ट होण्याची लक्षणे

रक्त घट्ट होण्याची लक्षणे तेव्हाच दिसतात जेव्हा रक्तात क्लॉटिंग सुरू होते. मात्र त्याची लक्षणे नक्की काय आहेत जाणून घ्या.

  • अस्पष्ट दिसणे
  • डोकेदुखी
  • उच्च रक्तदाब
  • त्वचेवर सतत खाज येणे
  • श्वास लागणे
  • थकवा येणे
  • चक्कर येणे
  • त्वचा निळी पडणे
  • मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होणे

या विटामिन्समुळे होते रक्त घट्ट

या विटामिन्समुळे होते रक्त घट्ट

NCBI च्या अहवालानुसार, विटामिन के रक्तातील गुठळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असते. मात्र याचा अधिक उपयोगही त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब अथवा रक्त घट्ट होण्याची समस्या असेल तर विटामिन – के पदार्थांचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.

(वाचा – ८०% व्यक्तींना Deja Vu ची होते जाणीव, ही घटना घडली असल्याचा होतो भास, काय आहे यामागील विज्ञान)

कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये

कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये

रक्तात गुठळ्या होत आहेत हे क्लिअर झाल्यानंतर तुमच्या आहारात या भाज्या अजिबात घेऊ नका अथवा कोणत्याही पद्धतीत याचे सेवन करू नका.

  • पालक – पालकामध्ये विटामिन के चे प्रमाण अधिक असल्यामुळे तुम्ही ही भाजी खाणे टाळणेच योग्य आहे. अन्यथा रक्तातील गुठळ्यांचे प्रमाण अधिक वाढेल.
  • केल – केलमध्ये रक्तातील गुठळ्यांना पोषक असणारे गुणधर्म असल्याने केलची भाजी अथवा कोणत्याही पदार्थांमध्ये केल असणं त्रासदायक ठरू शकतं.
  • ब्रोकोली – ब्रोकोलीमध्येही के विटामिन अधिक प्रमाणात असल्यामुळे रक्तातील क्लॉटिंगसाठी ही भाजी अजिबात खाऊ नये
  • सोयाबीन – सोयाबीन अतिप्रमाणात खाणं त्रासदायक ठरू शकतं. यामुळे रक्तात गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते
  • दुधी – दुधी हा खरा तर आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मात्र ज्यांना रक्त घट्ट होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी हे विष आहे

(वाचा – चपाती आणि भात एकत्र खात असाल तर वेळीच व्हा सावध, या ५ आजारांना देताय आमंत्रण)

रक्त पातळ करण्यासाठी काय खावे?

रक्त पातळ करण्यासाठी काय खावे?

हळद, आलं, लसूण, कोरफड आणि विटामिन ई असणारे पदार्थ ज्यामध्ये अँटी कोएगुलेंट गुण आढळतात ते तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी खाऊ शकता. पण तुम्ही एखादे औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा अजिबात उपयोग करू नये.

[ad_2]

Related posts