दोन बसची समोरासमोर धडक! चौघांचा मृत्यू, 70 जखमी; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची (Bus Accident) समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम येथे हा भीषण अपघात झाला. कुड्डालोर ते पाणरुती दरम्यान दोन खाजगी बसमध्ये हा अपघात झाला. एका बसचा पुढचा टायर फुटल्याने तिचे नियंत्रण सुटले आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

Related posts