बार्शी तालुक्यातील वैरागला अप्पर तहसिलदार कार्यालयाची मागणी

वैराग । राज्य शासनाने बार्शी तालुक्याचे विभाजन करून वैरागसह ५६ गावासाठी अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मिती करावी. अशी मागणी वैराग मधील सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी तहसीलदार सुनील शेरखाने यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देखील पत्र पाठवून अप्पर तहसील करण्यासाठी मागणी केली आहे. वैराग गावांतर्गत चार मंडल येतात यातील वैराग १० गावे, सुर्डि १४ गावे, पानगाव ८ गावे, गौडगाव १८ गावे येतात त्यातील सुमारे ५६ गावांचा देखील समावेश होतो. नव्याने झालेल्या वैराग नगरपंचायत तसेच वैराग ग्रामीण रुग्णालय देखील मंजूर झाले आहे. वैराग शहरात अप्पर तहसील व्हावे अशी वारंवार ग्रामीण भागाची देखील वारंवार मागणी होत आहे. वैराग भागाची वाढती लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ, यामुळे बार्शी तहसीलवर मोठा ताण निर्माण होतो. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय करणे शक्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. वैरागमध्ये शासकीय जागा कार्यालय इमारती उपलब्ध असल्याने अप्पर तहसीलसाठी काही अडचण निर्माण होणार नाही.

Related posts