LSG victory hero Mohsin Khan’s father was admitted to ICU IPL 2023; वडिलांनी मृत्यूला हरवलं, पठ्ठ्याने संघाला जिंकवलं; मैदानातूनच व्हिडिओ कॉल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ : यंदाचा आयपीएल हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात शेवटच्या षटकात लखनौ संघाने मुंबईचा ५ धावांनी पराभव केला. या विजयासह लखनौने आपले प्लेऑफ स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. लखनौने १३ सामन्यात १५ गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

शेवटच्या षटकात हिरो ठरलेला तो खेळाडू कोण?

मूळ उत्तर प्रदेशच्या असलेल्या २४ वर्षीय मोहसीन खान याच्यासाठी मागचा आयपीएलचा हंगाम यशस्वी ठरला होता. मात्र, या हंगामात खांदेदुखीमुळे तो बेंचवरच बसून होता. मागील १० महिने या खेळाडूसाठी खूपच आव्हानात्मक राहिले असून दुखापतीमुळे त्याला या सिझनच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकावे लागले होते. तसेच वडिलांच्या आजारपणामुळे मोहसीन चिंतेत होता.

यंदाच्या आयपीएल हंगामातील मोहसीनचा हा दुसरा सामना होता. या सामन्यात अंतिम षटकात मुंबईला ११ धावांची गरज होती. समोर टिम डेव्हिड आणि ग्रीन कॅमरुन ही आक्रमक फलंदाजांची जोडी पाय रोवून उभी होती. या वेळी लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याने चेंडू मोहसीन खानकडे दिला. मोहसीनने देखील आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मुंबईच्या फलंदाजांना केवळ ५ धावा करू दिल्या. यामुळे तो लखनौच्या विजयाचा हिरो ठरला.

MI Playoffs Scenario:मुंबई इंडियन्ससाठीचे प्लेऑफचे समीकरण; चक्क हार्दिक पंड्या मदतीला येऊ शकतो
शेवटच्या षटकातील गोलंदाजीबद्दल बोलताना मोहसीन याने सांगितले की, मी कर्णधार कृणाल बरोबर सात्यत्याने बोलत होतो. माझा रनअप देखील मी शेवटच्या षटकात बदलला नाही. तसेच मी स्वतःला शांत ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करत होतो. माझे स्कोअरबोर्डकडे लक्ष नव्हते, तर मला फक्त ६ चेंडू व्यवस्थित टाकायचे होते याच गोष्टीवर मी लक्ष देत होतो. या विकेटवर चेंडू रिवर्स स्विंग होत होता, ज्याचा मी फायदा घेतला.

१६ कोटी २५ लाखांची बोली लावून संघात घेतलं, तोच स्टोक्स CSK ला पडला महागात !

सामन्यानंतर पार पडलेल्या मुलाखतीमध्ये मोहसीन म्हणाला की, ‘ही वेळ माझ्यासाठी खूपच कठीण होती. मागील एक वर्षापासून मी क्रिकेट खेळलो नव्हतो, तसेच मागील १० दिवसांपासून रुग्णालयात ऍडमिट असलेल्या माझ्या वडिलांना कालच डिस्चार्ज मिळाला आहे. हा सामना मी त्यांच्यासाठी खेळलो असून त्यांनी नक्कीच मला ही कामगिरी करताना बघितले असेल’.

२५ कोटींवर भारी पडले २० लाख! शेवटच्या ओव्हरला मोहसीनची फाईट, MI ची हवा टाईट
मागील सामन्यात मी चांगली कामगिरी न करता देखील माझा संघ, संघातील सहकारी, गौतम गंभीर सर यांनी पुन्हा संधी दिल्याने मी सर्वांचे आभार मानतो असे देखील मोहसीनने सांगितले. मोहसीनने वडिलांना व्हिडिओ कॉल करुन आपल्या विजयाची गुड न्यूज दिली.

[ad_2]

Related posts