लायन्स क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष दिपक शहा यांचा ‘अ‍ॅम्बेसडर ऑफ गुडविल अ‍ॅवॉर्ड’ने सन्मान 

प्रग भारत . न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक सचिव व लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचे (Lions Club) माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांच्या शैक्षणिक तसेच, ग्रामीण भागातील शाळांना संगणक, गोरगरीब, दारिद्र रेषेखालील नागरिकांना डोळ्यांच्या इस्पितळाची उभारणी, वृद्धाश्रम, मतीमंद मुलांच्या आश्रमांना आर्थिक वस्तूरुपी मदत आदी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात गेली 36 वर्षे सातत्याने सक्रीय सहभाग घेत लायन्स क्लबच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल लायन्स क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष अ‍ॅलेक्झेन्डर डगलस यांनी घेवून त्याची निवड लायन्स क्लबच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार ‘अ‍ॅम्बेसडर ऑफ गुडविल अ‍ॅवॉर्ड’ क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन डॉ. प्रेमचंद बाफना यांच्याहस्ते मेडल देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लबचे माजी मल्टीपल कौन्सिल चेअरमन द्वारका जालन, प्रथम उप प्रांतपाल ला. परमानंद शर्मा, द्वितीय उपप्रांतपाल सुनिल चेकर, आजी-माजी पदाधिकारी ला. हेमंत नाईक, ला. रमेश शहा, ला. श्रीकांत सोनी, ला. भारती चव्हाण, ला. शरदचंद्र पाटणकर, ला. सी.डी. शेठ, ला.डॉ. अनिल तोष्णीवाल, ला. चंद्रा शेट्टी, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष ला. मयूर राजगुरव, महिला अध्यक्षा ला. राजश्री शहा, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, एम.बी.ए. चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस समवेत पुणे जिल्ह्यातील लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य महाविद्यालाचे प्राध्यापक, शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डॉ. प्रेमचंद बाफना आपल्या (Lions Club) मनोगतामध्ये पुढे म्हणाले, डॉ. दीपक शहा यांनी आपला व्यवसाय सांभाळून लायन्स क्लबच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात गरजू, वंचित, निराधार उपेक्षित, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्तरावर भरीव कामगिरी मानवतेच्या भूमिकेतून गेली 36 वर्षे अविरत करीत आहे. सन 2006 साली चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटची स्थापना करून अत्यंत अल्पावधीतच गुणवत्तापूर्वक शिक्षण विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाद्वारे देत आहे. आज 7 हजार 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे ही, अभिमानास्पद कामगिरी ते पार पाडीत आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. दीपक शहा म्हणाले, आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब (Lions Club) व महाविद्यालयातील गुरूजनांचे मान सन्मानाचे मी आभार मानतो. क्षेत्र कोणतेही असो छोट्या छोट्या गोष्टीतूनच माणूस घडत असतो. सहकार्‍यांचे प्रामाणिक साथ देखील महत्त्वाची असते.

पुरस्कार समारंभाचे नियोजनात प्रतिभा ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे हितेन करानी, मुख्याध्यापिका सविता टॅ्रवीस लायन्स क्लबचे प्रशांत शहा, सुभाष राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts