Vitamin C Rich Drinks To Control Sugar Immediately; डायबिटीसवर टॉनिकप्रमाणे काम करतात हे ५ ड्रिंक्स, सकाळीच प्याल तर शुगर राहील नियंत्रणात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

व्हिटग्रास ज्युस

व्हिटग्रास ज्युस

Wheatgrass Juice: साखरेची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही दिवसातून २ वेळा व्हिटग्रास ज्युस पिणे उत्तम ठरते. PubMed ने दिलेल्या अहवालानुसार, या सुपरफूडमध्ये असणारे मॅग्नेशियम इन्सुलिनची प्रतिक्रिया वाढविण्यास मदत करते आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी १ तास याचे सेवन करणे उत्तम ठरते.

बाजऱ्याचे पाणी

बाजऱ्याचे पाणी

बाजरीचे पाणी हे रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामबाण इलाज आहे. याशिवाय वजन कमी करून कोलेस्ट्रॉवरही नियंत्रण आणते. बाजऱ्याचे पाणी आतड्यांमधील प्रिवोटेलाको बॅक्टेरिया वाढवते आणि अनेक तास शुगर नियंत्रणात राहण्यास मदत करते. तसंच इन्सुलिन सेन्सिटीव्हीटीमध्येही सुधारणा करण्यास मदत करते.

(वाचा – किचनमधील छोट्याशा काळ्या पदार्थाचे पाणी पिऊन नसांमधील चिकट घाण येईल बाहेर, Bad Cholesterol वरील रामबाण उपाय)

सत्तूचे पाणी

सत्तूचे पाणी

सत्तूचे पाणी हे भाजलेल्या काळ्या चण्यांपासून तयार करण्यात येते. यामध्ये लाल मिरची पावडर, आलं, पुदिना, जिरे, लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्स करून हे पाणी प्यायल्याने साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते. हाय प्रोटीनयुक्त हे ड्रिंक लो कॅलरीयुक्त असून भूक नियंत्रणात आणते.

(वाचा – Varicose Veins मुळे होऊ शकतात अनेक गंभीर आजार, नसांमधून होते ब्लिडिंग फॉलो करा टिप्स)

ताक आहे उपयुक्त

ताक आहे उपयुक्त

ताकामध्ये जिरे, आलं, कोथिंबीर आणि काळे मीठ मिक्स करून प्यावे. हे चरबी आणि कॅलरीमध्ये कमी असून प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सयुक्त आहे. टाईप १ असो वा टाईप २ कोणत्याही डायबिटीसवर उत्तम औषधाप्रमाणे काम करते. याशिवाय याचे GI ब्लड शुगरची पातळी कमी करण्यास मदत करते.

(वाचा – या कारणाने सुकते हाडांमधील पाणी, शरीरात विटामिनची कमतरतेमुळे होतेय सांधेदुखी)

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, इलेक्ट्रोलाईट्स, विटामिन बी, अमिनो असिड इत्यादीसह पोषक तत्व असतात आणि मिनरल्सयुक्त नारळाच्या पाण्यात कॅलरीही कमी असते. ब्लड शुगर व्यवस्थित राखण्यासह पचन, त्वचेचे स्वास्थ्य आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.

या ड्रिंक्समुळे कोणतेही त्रास होण्याची संभावना नाही. तसंच तुमची साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts