biggest win in cricket histor, क्रिकेटमध्ये इतिहास घडला; आजपर्यंत असं कधीच झालं नाही, ४३५ धावांनी मिळवला विजय – biggest win in cricket histor tamil nadu sets record vijay hazare trophy 2022 beating arunachal pradesh by 435 run



( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट सामने सुरू आहेत. विजय हजारे ट्रॉफीत आज तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात लढत झाली. प्रत्येकी ५० षटकाच्या या सामन्यात तामिळनाडूने अरुणाचलचा ४३५ धावांनी पराभव केला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. याआधी लिस्ट ए मधील सर्वात मोठा विजय सोमरसॅच संघाच्या नावावर होता, त्यांनी ३४६ धावांनी विजय मिळवला होता.

अनेक विक्रमांची नोंद झालेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तामिळनाडूकडून एन जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी विक्रमी भागिदारी करून आजवरची मोठी धावसंख्या उभी केली. तामिळनाडूचे सलामीवीर जगदीशन आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ४१६ धावांची विक्रमी भागिदारी केली. सुदर्शनने १०२ चेंडूत २ षटकार आणि १९ चौकारांसह १५४ धावा केल्या. तर जगदीशनने १४१ चेंडूत १५ षटकार आणि २५ चौकारांसह २७७ धावांची विक्रमी खेळी केली. ५० षटकात तामिळनाडूने ५०६ धावांचा डोंगर उभा केला.

वाचा- निर्णयाक लढती आधी न्यूझीलंडला बसला झटका; अखेरच्या टी-२०मध्ये पाहा…

विजयासाठी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या अरुणाचल प्रदेशचा डाव २८व्या षटकात फक्त ७१ धावांवर संपुष्ठात आला. अरुणाचल प्रदेशच्या एकाही फलंदाजाला २०च्या पुढे धावसंख्या करता आली नाही. तामिळनाडूकडून मनिमरन सिद्धार्थने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. अरुणाचलविरुद्ध जगदीशन आणि सुदर्शन यांनी लिस्ट एच्या इतिहासातील सर्वात मोठी भागिदारी केली. या दोघांनी वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल आणि मार्लेन सॅम्यूल्स यांचा ३७२ धावांचा विक्रम मागे टाकला.

जगदिशनची गेल्या पाच सामन्यातील कामगिरी

१३ नोव्हेंबर आंध्र प्रदेश- नाबाद ११४
१५ नोव्हेंबर छत्तीसगड- १०७
१७ नोव्हेंबर, गोवा- १६८
१९ नोव्हेंबर, हरियाणा- १२८
२१ नोव्हेंबर, अरुणाचल प्रदेश- २२७

लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या

एन जगदीशन- २७७, २१ नोव्हेंबर २०२२
एडी.ब्राउन- २६८, १९ जून २००२
रोहित शर्मा- २६४, १३ नोव्हेंबर २०१४ (वनडे)

लिस्ट ए क्रिकेटमधील सलग शतक

एन जगदीशन- ५ शतक
कुमार संगकारा- ४ शतक
एल्वीरो पीटरसन- ४ शतक
देवदत्त पडिक्कल- ४ शतक

लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात मोठा स्कोअर

तामिळनाडू- ५०६ धावा विरुद्ध अरुणाचल प्रदेश
इंग्लंड- ४९८ धावा विरुद्ध नेदरलँड्स
सरे- ४९६ धावा विरुद्ध ग्लॉस्टरशायर

Related posts