Amit Shah Used To Get VIP Treatment In Jail Arvind Kejriwal Allegations( प्रगत भारत । pragatbharat.com)

Arvind Kejriwal On Amit Shah : दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील एक नुकताच च्यारलं झाला होता. या व्हिडीओमुळे आम आदमी पक्षावर विरोधी पक्ष नेत्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. या व्हिडीओत सत्येंद्र जैन हे पायाची मालिश करून घेताना दिसत आहेत. आता यावरूनच आपचे (AAP) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांना लक्ष्य केलं आहे.     

अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपचे लोक रोज बनावटी स्टिंग आणत आहेत. भाजपवाले मला रोज शिव्या देतात. या लोकांनी गलिच्छ राजकारण करणे बंद करावे. व्हिडीओबाबत भाजप म्हणत आहेत की सत्येंद्र जैन मसाज घेत आहेत. व्हीआयपी ट्रीटमेंट घेत आहेत. पण ही फक्त त्यांची फिजिओथेरपी आहे. डॉक्टरांनी त्याला सल्ला दिला होता. अमित शाह जेव्हा गुजरातमध्ये मंत्री होते. त्यांना जशी व्हीआयपी वागणूक मिळत होती. ती सत्येंद्र जैन यांना मिळत नाही आहे. 

दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना मे महिन्यात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. यातच त्यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते तुरुंगात मसाज करून घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडीओवरून भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप शेअर करताना अनेक भाजप नेत्यांनी लिहिले होते की, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात विशेष वागणूक मिळत आहे.

Reels

याचा व्हिडीओवरून आता आपने भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यावर बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले होते की, तुरुंगात दुखापत झाल्यानंतर सत्येंद्र जैन यांच्या पाठीच्या दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपीचा सल्ला दिला. सत्येंद्र जैन यांच्या वकिलांच्या टीमने ईडी विरुद्ध अवमानाची कारवाई करावी, ही मागणी करणारा अर्ज घेऊन विशेष न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायाधीशांनी ईडीला नोटीस बजावली. सत्येंद्र जैन यांच्या वकिलांनी आरोप केला आहे की, ईडीने न्यायालयात असे न करण्याचे आश्वासन देऊनही सीसीटीव्ही व्हिडीओ लीक केला आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Sangli News : सांगली ते मुंबई शहीद दौड उद्यापासून; 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करण्यासाठी आयोजन 

Related posts