Pune Crime News 11 Year-old Girl Sexually Abused By Stepfather In Pune( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news: सावत्र बापानेच (crime news) अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुण्यातील (Pune) दत्तवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 32 वर्षीय सावत्र बापावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 11 वर्षीय मुलीच्या आईने घडल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सावत्र बापावर कारवाई केली आहे. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांच्या राहत्या घरात हा प्रकार घडला. आरोपी हा तक्रारदार महिलेचा दुसरा पती आहे. महिलेची पहिल्या पतीपासून झालेली अकरा वर्षाची मुलगी त्यांच्या सोबत राहते. 9 नोव्हेंबरला घरात कोणीच नव्हतं. या सगळ्याचा फायदा नराधम बापाने घेतला. 11 वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करत तिचं लैंगिक शोषण केलं. हा सगळा प्रकार समजताच आईने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बापावर गुन्हा दाखल केला आहे. 

नात्यातील लोकांकडून अत्याचाराची प्रकरणं वाढली
कुटुंबियांकडून मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वीच नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. आजोबा, चुलता आणि वडिलांकडून 17 वर्षीय मुलीवर चार वर्ष लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली होती. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला होता. या प्रकरणी 49 वर्षीय वडिलांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली होती. मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. घरात परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवलं होतं. 2016 ते 18 ही दोन वर्ष मुली उत्तर प्रदेशात रहायला होती.

याच दरम्यान 33 वर्षीय चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर किमान वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिच्या आजोबांनी देखील तिचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. त्यानंतर 2018 मध्ये ती मुलगी पुण्यात आली. त्यावेळी आईवडिलांना तिने पत्र लिहून हा प्रकार कळवला होता. मात्र त्यानंतर वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आई काही कारणास्तव बाहेर गेली असता वडील तिच्यावर अत्याचार करायचे, असं पीडितेनं समुपदेशादरम्यान सांगितलं होतं. 

Reels

 

 

Related posts