dominique metzger robbed, तुम्हाला चोराला कोणती शिक्षा द्यायची आहे? कतार पोलिसांचा महिला पत्रकाराला प्रश्न, पाहा झालं तरी काय – argentinian tv reporter dominique metzger was robbed during live show in fifa world cup 2022( प्रगत भारत । pragatbharat.com)

दोहा: कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप २०२२ ला सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील पहिली लढत आयोजिक कतार आणि इक्वाडोर यांच्यात झाली. पहिल्या लढतीत कतारचा ०-२ असा पराभव झाला. या सामन्यानंतर एक चोरीची घटना उघडकीस आली.

उद्घटन सामन्याचे रिपोर्टिंग करण्यासाठी आलेल्या अर्जेंटीनाच्या एका पत्रकाराच्या बॅगमधून काही गोष्टी चोरी झाल्याचे समोर आले आहे. संबंधित महिला पत्रकाराने जेव्हा या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेली तेव्हा तिला कतार पोलिसांनी विचित्र वागणूक दिली.

वाचा- वर्ल्डकपसाठी आलेल्या खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड इथे राहतात; २ हजारहून अधिक रुम, डझनहून अधिक बार

पत्रकार डोमिनिक मेत्जर यांनी युके मिररला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्या तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे गेल्या तेव्हा त्यांनी विचारले की चोराला कोणती शिक्षा दिली पाहिजे. आमच्याकडे हायटेक कॅमेरे आहेत आणि आम्ही चोराला पकडू. तुम्ही त्याला काय शिक्षा देऊ इच्छीता. तुम्हाला त्याला पाच वर्षाची शिक्षा द्यायची आहे की त्याला देशाबाहेर हकलून द्यायचे आहे.

वाचा- फुटबॉलचा फिव्हर Live; भारतात कधी, कसा पाहाल फिफा वर्ल्डकप, संपूर्ण शेड्यूल एका…

कतारमध्ये स्पर्धेचे रिपोर्टिंग करताना अनेक पत्रकारांना अडचणी येत आहेत. यादी डेनिश पत्रकाराला त्याच्या वृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करताना रोखण्यात आले. या प्रकरणी आयोजिकांनी नंतर माफी मागितली. रिपोर्टरला चुकीने थांबवण्यात आले.

वाचा- क्रिकेटमध्ये इतिहास घडला; आजपर्यंत असं कधीच झालं नाही, ४३५ धावांनी मिळवला विजय

२० नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा २८ दिवस चालणार आहे. स्पर्धेत एकूण ३२ देश असून ६४ लढती होणार आहेत. अंतिम मॅच १३ डिसेंबर रोजी होईल.

Related posts