…अन् ‘जन गण मन’ गायल्यानंतर अमेरिकन गायिका मोदींच्या पाया पडली; पाहा भारतीय म्हणून अभिमान वाढवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mary Millben Touches Modi’s Feet: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच अमेरिका दौऱ्यावर (US Visit) गेले होते. अमेरिका दौरा संपवून आता नरेंद्र मोदी इजिप्तच्या (Egypt) दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन (Mary Millben) जाहीर मंचावरच नरेंद्र मोदींच्या पाया पडल्या. भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ (Jana Gana Mana) गायल्यानंतर मेरी ज्यूरी मिलबेन यांनी नरेंद्र मोदींच्या पाय पडत आशीर्वाद घेतले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडल्यानंतर भारतासह जगभरात चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. नरेंद्र मोदी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रिगन सेंटरमध्ये उपस्थित भारतीयांना संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्या कार्यक्रमाआधी राष्ट्रगीत झालं. नरेंद्र मोदी मंचावर दाखल होताच अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन यांनी भारतीय राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. यानंतर मिलबेन यांच्यासह नरेंद्र मोदी आणि रोनाल्ड रिगन सेंटरमध्ये उपस्थित भारतीयांनीही ‘जन गण मन’ गाण्यास सुरुवात केली. 

राष्ट्रगीत संपल्यानंतर मिलबेन या नरेंद्र मोदींच्या दिशेने चालत आल्या आणि त्यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. युनायटेड स्टेट्स इंडियन कम्युनिटी फाऊंडेशनने (United States Indian Community Foundation) हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

अफ्रिकन-अमेरिकन हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी ज्यूरी मिलबेन भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि ‘ओम जय जयदीश हरे’ गाणी गायल्याने भारतीयांमध्ये प्रसिद्ध आहे. कार्यक्रम सुरु होण्याआधी मेरी ज्यूरी मिलबेन यांनी पंतप्रधान मोदींसाठी भारतीय राष्ट्रगीत सादर करणं माझ्यासाठी फार सन्मानजक आहे असं म्हटलं होतं. 

“सलग चार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी अमेरिकन राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर संगीत सादर केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आणि मी ज्यांचा कुटुंब म्हणून उल्लेख करते त्यांच्या सन्मानार्थ भारतीय राष्ट्रगीत सादर केल्याबद्दल मला खूप सन्मान वाटत आहे,” असं त्यांनी निवेदनात सांगितलं. 

“अमेरिकन आणि भारतीय राष्ट्रगीत लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या आदर्शांवर भाष्य करतं आणि हे अमेरिका आणि भारतीय संबंधांचं सार आहे. मुक्त लोकच मुक्त राष्ट्राची खरी व्याख्या आहे,” असं त्यांनी सांगितलं. 

गेल्या महिन्यात, पंतप्रधान मोदींच्या पापुआ न्यू गिनी दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आदर म्हणून पंतप्रधान मोदींच्या पाया पडले होते. यानंतर नरेंद्र मोदी तेथून निघत असताना एक पुरुष आणि महिलेने पंतप्रधानांसमोर नतमस्तक होत आदर व्यक्त केला होता. 

Related posts