luxury cruise ship in qatar, वर्ल्डकपसाठी आलेल्या खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड इथे राहतात; २ हजारहून अधिक रुम, डझनहून अधिक बार – football world cup 2022 england players wife and girlfriends luxury cruise ship in qatar( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: फिफा वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. फक्त ३० लाख लोकसंख्या असलेल्या देशात जगातील सर्वात लोकप्रिय असा फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजन होत आहे. जगभरातील चाहते कतारमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे देशात हॉटेलची संख्या कमी पडत आहे.

अशात इंग्लंडचे अनेक चाहते, खेळाडूचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी एका क्रुझ शिपवर थांबणार आहेत. जवळ जवळ एक बिलियन पाउंड किमत असलेल्या या क्रुझवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे जहाज एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही. यामुळेच इंग्लंड संघातील सर्व खेळाडूंच्या पत्नी, कुटुंबिय आणि गर्लफ्रेंड यांनी या ठिकाणी स्पर्धा होई पर्यंत इथे थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या क्रुझवर सर्व खेळाडू थांबले आहेत त्याचे नाव MSC World Europa असे आहे. याचा समावेश जगातील सर्वात मोठ्या क्रूझ शिपमध्ये केला जातो. यात जवळ जवळ ३३ बार आणि कॅफे, १४ पूल, १३ डायनिंग वेन्यू, ६ स्विमिंग पूल आहेत.

वाचा- क्रिकेटमध्ये इतिहास घडला; आजपर्यंत असं कधीच झालं नाही, ४३५ धावांनी मिळवला विजय

दोहाच्या समुद्र किनाऱ्यावर हे क्रुझ स्पर्धा संपेपर्यंत असणार आहे. एका फाइव्ह स्टार हॉटेलचे काम हे क्रुझ करेल. या क्रुझवर ७ हजार लोकं राहु शकतात. यावेळी जहाजावर असलेल्या लोकांपैकी अधिकतर इंग्लंडच्या खेळाडूंचे कुटुंबिय आणि मित्र आहेत.

वाचा- फुटबॉलचा फिव्हर Live; भारतात कधी, कसा पाहाल फिफा वर्ल्डकप, संपूर्ण शेड्यूल एका…

या क्रुझवर १ हजारपेक्षा अधिक केबिन आहेत. यात बेड, वॉर्डोब, बाथरुम, टीव्ही सारख्या सुविधा आहेत. पण खरी गंमत या लग्जरी रुमच्या बाहेर आहे. जेथे जगभरातील सर्व प्रकारचे जेवण उपलब्ध आहे. जेणेकरून ज्याला हवे ते जेवण देता येईल.

कतारमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी अनेक निर्बंध देखील आहेत. ज्यात महिलांना छोटे कपडे घातला येणार नाहीत, सार्वजनिक ठिकाणी मद्य पिता येणार नाही. यामुळे इंग्लंड फुटबॉल संघाने खेळाडूंच्या पत्नी, गर्लफ्रेंड यांना एक नियमावलीच दिली आहे. इंग्लंडचा संघ यावेळी ग्रुप बी मध्ये असून त्यांची पहिली मॅच इराण विरुद्ध होणार आहे.

Related posts