When, Where To Watch India Tour Of New Zealand Match IND Vs NZ 3rd T20 Know Details



( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs New Zealand Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यातील टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे.

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या टी20 मालिकेत कर्णधार बनून मैदानात उतरणार आहे.तसंच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून भविष्यातील टी20 सामन्यांच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात बदलाची शक्यता असून या मालिकेतून खेळाडूंचा खेळ तपासण्याची संधी बीसीसीआयकडे आहे. दरम्यान आज होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

Reels

कुठे आहे सामना?

आजचा हा भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील तिसरा टी20 सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?

हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

भारताची मालिकेत आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. वेलिंग्टनमध्ये होणारा सामना रद्द झाल्यानंतर आज दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता मंगळवारी तिसरा सामना खेळवला जाणार असून भारताने तो जिंकल्यास मालिकाही भारत जिंकल, तसंच न्यूझीलंडने सामना जिंकल्या मालिका अनिर्णीत सुटणार आहे. 

हे देखील वाचा-

Related posts