murder mystery cases in india, १ घर, ४ फास आणि ६ जणांचे शव; अंगाचा थरकाप उडवणारी घटना; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा – rajasthan udaipur parents 4 children end life at home delhi santnagar burari incident police investigation( प्रगत भारत । pragatbharat.com)

उदयपूर : दिल्लीतील बुराडी घटनेच्या हृदयद्रावक आठवणींना उजाळा देणारी एक भयानक घटना राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात समोर आली आहे. बुराडीच्या घरातील असे दृश्य जिथे एकाच घरात १० लोकांचे मृतदेह फासावर लटकत होते. उदयपूरच्या गोगुंडा तहसीलमधील एका गावात सामूहिक मृत्यूची अशीच घटना समोर आली आहे.

पती-पत्नी आणि ४ निष्पाप मुलं…

उदयपूरच्या गोगुंडा तालुक्यात एक गाव आहे. नाव गोल नेडी. गावातील लोकही शेती करतात आणि बरेच लोक शहरात जाऊन काम करतात. त्याच गावात एक कुटुंब होतं. जे आदिवासी समाजातून येतं. प्रकाश गमेती असे कुटुंबप्रमुखाचे नाव होतं. त्यांच्या पत्नीचे नाव दुर्गा गमेती होते. दोघांना चार मुले होती. अवघ्या ३ ते ४ महिन्यांचा गंगाराम, ५ वर्षांचा पुष्कर, ८ वर्षांचा गणेश आणि ३ वर्षांचा रोशन.

चोराचा थाट बघतच राहाल! दरवाजा तोडून घुसला, बाथटबमध्ये अंघोळ; एक झोप काढून कॉफी प्यायला अन्…

सकाळी घरी पोहोचला भाऊ अन्…

वास्तविक हे कुटुंब गावातील शेताच्या टोकाला बांधलेल्या घरात राहायचं. तिथे प्रकाश आणि त्यांच्या दोन भावांची घरे शेजारी शेजारी बांधली होती. प्रकाश हा गुजरातमध्ये काम करायचा. सोमवारीही रोजप्रमाणेच लोकांची सकाळपासूनच कामं सुरू झाली. प्रत्येकजण आपापल्या कामाला जायला तयार होत होता. अशात प्रकाश यांचा भाऊ त्यांच्या घरी आला. त्याने दार ठोठावले. पण कोणीच दरवाजा उघडला नाही.

घरात लटकले होते ४ मृतदेह…

प्रकाशच्या भावाला काळजी वाटू लागली. तो आरडाओरडा करून दार वाजवत असल्याचे पाहून गावातील लोकही तिथे जमा झाली. यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला आणि दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच गावकऱ्यांनी स्वप्नातही समोरच्या दृश्याची कल्पना केली नसेल. घराच्या आतील छताला चार मृतदेह लटकले होते आणि दोन मृतदेह जमिनीवर पडले होते. हे भयानक दृश्य पाहून ग्रामस्थ आणि प्रकाशचा भाऊ घाबरले.

जमिनीवर पडलेले दोन मृतदेह…

आपला भाऊ, वहिनी आणि चार निष्पाप पुतणे या जगात नाहीत यावर प्रकाशच्या भावाचा विश्वास बसत नव्हता. वास्तविक, प्रकाश आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह ओढणी आणि साडीच्या सहाय्याने छताला लटकलेले होते. तर त्यांची पत्नी दुर्गा आणि अवघ्या ३ महिन्यांचा मुलगा गंगाराम घराच्या फरशीवर मृतावस्थेत पडले होते. घरचे हे हृदय पिळवटून टाकणारे चित्र पाहून लोकांना समजले नाही की हे कसे घडले?

कारचालकाने पहिल्यांदाच ब्रँडी घेतली अन् ५ जणांना उडवलं, शुद्धीत येताच कारण ऐकून सगळे थक्क…
गावात शोककळा…

प्रकाश यांचे भाऊ व नातेवाईक तिथे जमले होते. सर्वत्र शोककळा पसरली होती. गमेती कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. याबाबत प्रकाश यांच्या दुसऱ्या भावाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. यानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

हत्येनंतर आत्महत्या!

तपासादरम्यान प्रकाश आणि त्याच्या भावांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे पोलिसांना आढळून आले. घटनास्थळावरून गोळा केलेले बहुतांश पुरावे आत्महत्येकडे निर्देश करणारे होते. तपासादरम्यान प्रकाशची पत्नी दुर्गा हिच्या अंगावर जखमेच्या खुणा असल्याचे पोलिसांना आढळून आले. जे पाहून आधी प्रकाशने पत्नी आणि सर्व मुलांचा गळा दाबून खून केला आणि नंतर पत्नीचा दुपट्टा आणि साडीने तीन मुलांना फाशी दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर धाकट्या मुलाला आणि पत्नीला जमिनीवर झोपवले. यानंतर आणि मग त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Pune Crime: गर्लफ्रेंडला नको होती बॉयफ्रेंडची बायको, कायमचं संपवण्यासाठी केलं भयंकर कृत्य

Related posts