NIA Arrests Most Wanted Khalistani Terrorist Khanpuria Kulwinderjit Singh Carrying Reward Rs 5 Lakh From Delhi Airport NIA Arrests Terrorist( प्रगत भारत । pragatbharat.com)

NIA Arrested Khalistani Terrorist : राष्ट्रीय तपास यंत्रणेला ( NIA ) मोठं यश मिळालं आहे. एनआयएने दिल्ली विमानतळावरून फरार ( Most Wanted ) खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. या खलिस्तानी दहशतवाद्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीस होतं. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. कुलविंदरजीत सिंह ( Kulwinderjit Singh ) उर्फ ​​‘खानपुरिया’ ( Khanpuria ) असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी कुलविंदरजीत सिंह बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. त्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, खानपुरियाचा पंजाबमध्ये अनेक हत्या आणि तसेच दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभाग होता. तो 2019 पासून फरार होता. दहशतवादी खानपुरियावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. खानपुरिया शुक्रवारी बँकॉकहून भारतात आला. एनआयएला याची माहिती मिळताच त्याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली.

reels

दिल्लीच्या सीपीमधील बॉम्बस्फोटातही हात

90 च्या दशकात नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरण तसेच अन्य राज्यांमध्ये ग्रेनेड हल्ल्यांमध्येही कुलविंदरजीत सिंहचा हात होता. अहवालानुसार, कुलविंदरजीत खानपुरिया हा पंजाबमधील डेरा सच्चा सौदाशी संबंधित आस्थापनांना तसेच पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा मास्टरमाईंड आहे. अनेक राज्यांचे पोलीस त्याच्या शोधात होते.

देशात दहशत निर्माण करण्यासाठी योजना 

पंजाबसह संपूर्ण देशात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कुलविंदरजीत सिंहने भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ, चंदीगडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केलं. त्याने काही टार्गेट्सची रेकीही केली होती. याविरुद्ध 30 मे 2019 रोजी पोलीस स्टेशन स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (SSOC), अमृतसर येथे आणि त्यानंतर 27 जून 2019 रोजी NIA द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते.Related posts