kitchen hacks how to remove bone from a sardine fish watch viral video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. मुळात गेल्या काही वर्षांमध्ये मत्स्यप्रेमींची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. यामध्ये कोलंबी (prawns), माकोल (Squid), सुरमई (Surmai) खाणारे असो किंवा खेकडा (Crab), लॉब्स्टर (Lobster) खाणारे असो. (Fish thali) माशांनी भरलेलं ताट पुढ्यात आलं की त्यावर आडवा हात मारत जेवण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मासे खाणं सोपं, पण ते बनवण्यासाठी, ते स्वच्छ करण्यासाठी लागणारी मेहनत आणि कला नाकारता येणार नाही. 

बऱ्याचदा तर, योग्य पदार्थासाठी मासे तितक्याच वेगळ्या प्रकारांनी कापले जातात. तितक्याच विभिन्न पद्धतींनी ते स्वच्छही केले जातात. पण, ते स्वच्छ करणं सर्वांनाच जमतं असं नाही. 

 

तुम्हीही त्यातलेच एक आहात का? हरकत नाही. युट्यूबवरचा (You tube video) अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही काटेरी मच्छीतून काटा वेगळा करून तिचा आस्वाद घेऊ शकता. कसं? Uran Karanjekar या युट्यूबरनं नुकतंच त्याच्या You Tube Channel वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या Short Video मध्ये त्यानं तारली माशाचे काटे कसे काढायचे हे दाखवलं आहे. 

(Sardine Fish) तारली मासा चवीला सर्वात उत्तम. पण, त्यामध्ये बरेच काटे असल्यामुळे इच्छा असतानाही अनेकजण तो खाताना नाकं मुरडतात. पण, यापुढे असं होणार नाही. कारण, तुम्हीसुद्धा सहजपणे माशाचे काटे काढू शकता. 

कशा पद्धतीनं काढाल माशातील काटा?

माशातील काटे काढण्यासाठी सर्वप्रथम त्याची खवले काढून घ्या. एका सुरीच्या सहाय्यानं तुम्ही हे करु शकता. फक्त हलक्या हाताने सुरीचं पातं वरच्या बाजूला फिरवा. त्यानंतर माशाच्या डोक्याचा भाग अशा पद्धतीनं वेगळा करा, जिथून माशाच्या पोटातील घाणही सहजपणे त्यासोबतच निघेल. आता माशाच्या शेपटीला न कापता त्याभोवती गोलाकार चिर मारा (circular cut).

माशाचा मधला काटा नेमका कुठे हे आपल्याला ठाऊक असल्यामुळं थोडासा दाब देऊन तो काटा वरचेवर मोडून घ्या. आता शेपटीला पडतून ज्या भागामध्ये तुम्ही चिर लावली आहे, तिथपासूनचा भाग हळूहळू वरच्या बाजूला ओढा. यावेळी माशाचं शरीर तुमच्या दुसऱ्या हातात असेल याची काळजी घ्या. 

पाहा व्हिडीओ 

माशातील काटा काढून बनवा सुरेख रेसिपी 

क्षणातच माशाचा संपूर्ण काटा तुम्ही बाहेर काढलेला असेल. आता ही तारली तुम्हाला हवी त्या पद्धतीनं शिजवा आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्या. सहसा (Konkani Food) कोकण किनारपट्टी भागामध्ये (Tarli/ sardine Fish curry) तारली माशाच्या कालवणाला पसंती दिली जाते. ओल्या खोबऱ्यातील वाटणात काही घरगुती मसाले आणि आमसुलं वापरून एक सुरेख असा पदार्थ या माशापासून तयार केला जातो (Fish recepies). 

Related posts