municipal School students Didnt get sweaters( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या शाळांमधील निम्म्या विद्यार्थ्यांवर स्वेटरविना कुडकुडण्याची वेळ आली आहे. स्वेटरची अनुदानाची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली नसल्याने दुसरी, चौथी, सहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

मनपाच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीचे ८९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात इयत्तानिहाय १५०० ते ४५०० रुपये जमा केले जातात. यंदाही ही प्रक्रिया राबवली जात आहे. पहिली, तिसरी, पाचवी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना स्वेटरसाठी २६० ते २८० रुपये देण्यात आले. मात्र, दुसरी, चौथी, सहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्याप जमा झाली नाही.

शहरातील थंडी दिवसेंदिवस वाढत आहे. अशात पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे निम्मे विद्यार्थी कुडकुडत शाळेत येत आहेत. पैसे जमा न झालेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात तातडीने पैसे जमा करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, विद्यार्थ्यांना वर्षाआड स्वेटरसाठी पैसे दिले जातात. त्यामुळे यंदा दुसरी, चौथी, सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात स्वेटरसाठीची रक्कम जमा झालेली नाही, असे पालिकेच्या शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.

Scholarship: पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारीला
Smart School: पालिकेच्या शाळा बनणार स्मार्ट स्कूल

विद्यार्थी संख्येत वाढ

करोनामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२मध्ये महापालिकेच्या शाळांमधून गायब झालेल्या विद्यार्थ्यांनी या वर्षी पुन्हा एकदा शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. करोनाकाळात घटलेली पटसंख्या पुन्हा पूर्वपदावर आली असून, शाळेपासून दूर गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये प्रवेश घेतल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागासमोर निर्माण झालेले, पटसंख्येला लागलेल्या उतरणीचे आव्हान तूर्तास तरी थांबले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक ते दीड वर्षाच्या कालावधीत शहरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांनी स्थलांतर केले. त्यांची मुलेही स्थलांतरित झाल्याने गेल्या दोन वर्षांत महापालिकेच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच कमी झाली. सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांनी शालाबह्य झाल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गेल्या वर्षी प्रसिद्ध केले होते. ही विद्यार्थ्यांची गळती थांबवण्याचे आव्हान महापालिकेच्या शिक्षण विभागासमोर होते.

BARTI: अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांना २ लाख देणारी बार्टीची योजना गेली कुठे?

Related posts