Shraddha Walkar Case Big Update; Aftab Poonawala Confess The Crime( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला आज साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान आफताबने कोर्टात न्यायाधीशांसमोर मोठी कबुली दिली. आफताबने अखेर श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर जे काही झालं ते रागाच्या भरात झालं असंही त्याने सांगितलं. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. पोलिसांच्या मागणीवरुन कोर्टाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

कोर्टात आफताब म्हणाला की, मी जे काही केले ते रागाच्या भरात केले. तया प्रकरणात तपासासाठी सहकार्य करतोय, पुढेही करत राहिल, असंही आफताबने न्यायाधीशांना सांगितले. मात्र, तो प्रसंग आठवण्यात अडचण येत आहे, असं तो म्हणाला. आफताबने कोर्टात सांगितले की, पोलीस चौकशीदरम्यान त्याने नकाशा बनवून श्रद्धाचे अवयव कुठे फेकले होते ते सांगितले. त्याने श्रद्धाची कवटी एका तलावाजवळ फेकून दिली होती. बरेच महिने उलटून गेल्यामुळे त्याला नेमके ठिकाण आठवत नाही.

दुसरीकडे, आफताबने नकाशात एका तलावाबाबत सांगितले. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, श्रद्धाच्या हत्येच्या तपासासाठी १४ पथकं तयार करण्यात आली आहेत. ही सर्व १४ पथकं पुरावे शोधणार आहेत. लोकेशन रुटच्या आधारे शोध घेतला जाईल. मेहरौली, गुरुग्रामच्या जंगलांजवळ कचरा वेचणाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, जेणेकरून या प्रकरणाशी संबंधित काही माहिती मिळेल.

हेही वाचा -Shraddha Case: फ्रिज घेताना श्रद्धाचा नंबर, मग त्यातच तिचे तुकडे ठेवले; आफताबच्या डोक्यात नेमकं होतं तरी काय?

तिसऱ्यांदा पोलीस कोठडीत वाढ

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आफताबला दोनदा पाच दिवसांची कोठडी घेतली होती. आता त्याला आणखी चार दिवसांची कोठडी मिळाली आहे. आता आफताबची नार्को चाचणी आणि पॉलीग्राफ चाचणी करावी लागणार आहे. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी दिल्ली पोलिसांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

आफताबचे वकील अविनाश कुमार यांनी सोमवारी सांगितले होते की, पोलीस मंगळवारी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतात. पोलिस दोन दिवसांहून अधिक काळ रिमांड मागणार असतील तर आफताब बराच काळ पोलीस कोठडीत असल्याचे सांगत मी त्याला नक्कीच विरोध करेन.

हेही वाचा -IND VS NZ: वर्ल्ड कपच्या पराभवातून धडा घेतला, रोहितने केलेल्या चुका हार्दिक पंड्याने सुधारल्या…

आफताब १२ नोव्हेंबरला अटक केली

आफताबला १२ नोव्हेंबरला दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये श्रद्धाची हत्या केल्याच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे केले, जे त्याने तीन आठवडे घरी ३०० लिटरच्या फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर अनेक दिवस वेगवेगळ्या भागात फेकून दिले. आता आफताबच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आणखी काय काय माहिती समोर येते हे पाहावं लागणार आहे. तर, पोलीस अजूनही श्रद्धाचं शीर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

विनयभंग नाही; आव्हाडांच्या वकिलांनी पुराव्यादाखल कोर्टात दाखवला व्हिडीओ

Related posts