Maharashtra News Nashik News Effect Of Growing Cold On Rose Farming In Niphad( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Cold : नाशिकसह (Nashik) निफाड तालुक्यात (Niphad) तापमानात दिवसेंदिवस घट होत असून नाशिककर चांगलेच गारठले आहेत. अशातच निफाड तालुक्यातील गुलाबाची शेतीही (Rose Farming) गारठली असून शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणखी थंडी वाढल्यास उत्पादनांवर देखील परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासुन नाशिककरांसह जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज देखील तापमानात (Temperature) घट झाली आहे. शिवाय नाशिक शहराचा पारा 9.2 अंशावरून थेट 9.5 अंशापर्यंत गेला आहे. तर दुसरीकडे काल राज्यात सर्वाधिक थंड असलेल्या ओझर (Ojhar) परिसरात तापमानात किंचितसा बदल झाला असून आज ओझर शहराचे तापमान 6.9 अंशावर गेले आहे. तर जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 7.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादकांसह निफाड तालुक्यातील शेतकरीही धास्तावले आहेत.

नाशिक शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा कमी अधिक अंशांनी घसरत आहे. नाशिक जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 7.4 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर तालुक्यातील ओझर शहरात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये काल 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती, तर आज 6.9 अंशावर तापमान गेले आहे. दरम्यान निफाड तालुक्यातील अनेक भागात गुलाबाची शेती करण्यात येते. या शेतीवरही थंडीचा परिणाम जाणवू लागला असून शेतकरी फवारणी करू गुलाबाच्या शेती काळजी घेत आहेत. त्याचबरोबर आणखी थंडी वाढल्यास उत्पादनांवर देखील परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

गुलाब शेतीची विशेष काळजी 
नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये तापमानाचा पारा हा चांगलाच घसरलात कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक गारठले असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागली आहेत. तर दुसरीकडे गुलाबाची शेती करणारे शेतकरी सकाळपासूनच आपल्या गुलाबाच्या शेतीत गुलाबाची काळजी घेत आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये हे गुलाबाचे फुल अधिकच मनमोहक आणि सुंदर असं वाटू लागलं आहे. शिवाय बाराही महिने या झाडाला गुलाब येत असतात मात्र सध्या तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे फुल काळी पडू लागली आहेत. तरीदेखील उत्पन्न चांगले असून बाजारभावात घसरण पाहायला मिळते आहे. येथील गुलाब हे कल्याण, मुंबई सुरत आदी शहरात पाठवले जात असल्याने थंडीच्या दिवसांत शेतकऱ्यांकडून गुलाब शेतीची विशेष काळजी घेतली जात आहे. 

Reels

शेकोट्यांचा जोर 
नाशिक शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडल्याने कुठे शेकोट्या, कुठे जिम, जॉगिंग ट्रकला गर्दी पाहायला मिळत आहेत. तर अनेकजण थंडीमुळे घरातच थांबणे पसंत करत आहेत. दरम्यान नोव्हेंबर संपायला आला तरी नाशिकमध्ये कडाक्‍याची थंडी जाणवत नव्‍हती. मागील चार दिवसांमध्ये तापमानामध्ये कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले. म्हणजेच गेल्‍या काही दिवसांपासून तापमानात कमालीची घट होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण शेकोट्या पेटत असून शहरात जिम, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅकवर गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान नाशिक शहरातील मागील पाच तापमानाची आकडेवारी पहिली तर लक्षात येईल कि, एक एक अंशाने तापमानात घट झाली आहे. 

Related posts