immunity booster vegetable, Foods boost Immunity : थंडीत इम्युनिटी होते 0, करोना व भयंकर रोगांचा वाढतो धोका, हे 6 जबरदस्त उपाय ठेवतात ठणठणीत – nutritionist shikha aggarwal shared 5 foods that protect from winter disease and boosting immunity power( प्रगत भारत । pragatbharat.com)

थंडीचा हंगाम सुरू झाला असून येत्या काही महिन्यांत थंडीचा कडाका वाढणार आहे. थंडीची चाहूल लागताच सर्दी, फ्लू आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोकाही वाढू लागला आहे. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचा धोका जास्त असतो आणि त्यामुळेच बहुतेक लोक आजारी राहतात. हिवाळ्यात लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी अधिक सावध राहावे. बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी आणि शरीराला आतून मजबूत बनवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे.

फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट व डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, बहुतेक लोक हिवाळ्यात घरामध्येच राहतात, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि व्हायरस एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे सहज पसरू शकतात. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खालील उपाय करून पहा.

बाजरी व नाचणीचे सेवन

शिखाच्या मते, बाजरी, नाचणी आणि राजगिरा यांसारख्या धान्यांचा आहारात समावेश करावा. ही धान्ये शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

(वाचा :- लघवीतून येत असेल या प्रकारचा वास तर समजून जा शरीरात घेतलीये या 6 भयंकर आजारांनी एंट्री, ताबडतोब करा खालील उपाय)

एकाचवेळी जेवण्यापेक्षा दिवसभर थोडं थोडं खा

एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी तुम्ही दिवसातून अनेक वेळा लहान लहान प्रमाणात आणि पोषक तत्वांनी समृध्द असणारे जेवण खाऊ शकता. हे तुम्हाला जास्त काळ तृप्त राहण्यास मदत करेल आणि जास्तीची चरबी शरीरात जाण्यापासून बचाव होईल.

(वाचा :- Weight Loss: लटकणारी पोटाची चरबी लपवायला घालायचा जॅकेट, या 2 उपायांनी 18 किलो वेटलॉस करत बदलली पूर्ण पर्सनॅलिटी)

जास्तीत जास्त भाज्या खा

आपल्या आहारात गाजर, रताळी यांसारख्या कंदमुळे असलेल्या भाज्यांचा समावेश करा. ते अँटिऑक्सिडंट्स, कॅरोटीनोइड्सने भरलेले असतात आणि सेल्युलर नुकसानापासून संरक्षण करतात. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, पालक, राजगिरा, बथुआ यांचा समावेश करा. ते मॅग्नेशियममध्ये समृद्ध आहेत आणि शरीरातील सेल्युलर प्रक्रियांचे नियमन करतात.

(वाचा :- Breakfast मध्ये हा एक पदार्थ खाल्ल्याने तरूणाचं Liver कायमचं डॅमेज झालं, तुम्ही खात नाहीयेत ना हा विषारी नाश्ता?)

डिंकाचे लाडू खा

शरीर तृप्त ठेवण्यासाठी उर्जेने भरलेले डिंगाचे लाडू खा. रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी हळद घातलेले गरम दूध प्या.

(वाचा :- या एका चुकीमुळे गेला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थचा जीव, थकवा व कमजोरीसोबत कधीच जाऊ नये GYM ला, काय आहे ती चूक..?)

खूप पाणी प्या

त्रिदोष (कफ, वात आणि पित्त) संतुलित करण्यासाठी सकाळी सर्वप्रथम तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. तुमची त्वचा मऊ, क्लिन आणि ओलसर ठेवण्यासाठी हायड्रेटेड रहा.

(वाचा :- हे 3 पदार्थ खाणं आजच थांबवा नाहीतर लठ्ठपणा व येईल हार्ट अटॅकची वेळ, Weight Loss साठी आयुर्वेदिक डॉक्टरच्या टिप्स)

औषधी वनस्पतीही आहेत बहुगुणी

हिवाळ्यात तुळस, वेलची, लवंग आणि दालचिनी यांसारखे भरपूर मसाले आणि औषधी वनस्पतींचे सेवन केले पाहिजे कारण ते आपले शरीर उबदार ठेवतात व रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात.

(वाचा :- Toxic Gut: आतड्यांत घाण व विषारी पदार्थ साचल्यास शरीर देतं हे 5 भयंकर संकेत, हे 5 नैसर्गिक उपाय करतात आतडी साफ)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Related posts