Maharashtra News Nashik News Renovate Mumbai Agra Highway, Bhujbal’s Letter To Gadkari( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhagan Bhujbal : मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाशिक शहरात रस्ता उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई- नाशिक (आग्रा) सहापदरी महामार्ग भारतमाला प्रोजेक्टमध्ये समावेश करून त्याचे पुढील सहा महिन्यात भूमिपूजन देखील करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. दरम्यान या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी नव्याने पत्र पाठवले आहे. 

माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण 4 ऑक्टोबर 2014 रोजी नाशिकमधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे लवकरात लवकर हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे. नाशिक ते मुंबई (Nashik Mumbai) हा फोर लेन रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे.  शहापुर ते वडपे परिसरातील अत्यंत रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा  निर्माण होतो. 

जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्कचा (Logistic Park) प्रसार त्यामुळे  या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी तासंतास प्रवाश्यांचा वेळ यामध्ये जात आहे. लॉजिस्टिक्स पार्कमुळे मोठमोठे कंटेनर क्रॉसिंग व कंटेनर वाहतुकीमुळे सतत वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र या सहापदरी रस्त्याचा डी.पी.आर मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु व्हायला शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नुतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबी मधील कामाचे तात्काळ नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

Reels

पुढे म्हटले आहे की, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन 2014 मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षाने या रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट या कामाच्या आदेशात आहे. मात्र संबधीत कंपन्यांकडून करारातील स्पेसिफिकेशनप्रमाणे सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी उंचवटे व खोलगट भाग तयार झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सहापदरी रस्त्याचे प्रत्यक्ष काम होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Related posts