Viral Video : एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने चिमुकलीला दिली धडक, त्यानंतर जे झालं ते पाहून तुमचे डोके चक्रावेल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Road Accident Viral Video : नजर हटी दुर्घटना घटी! अशी म्हण आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. रस्त्यावरुन वाहतुकीच्या वेळी असो किंवा रस्ता ओलांडताना असो डोळ्यात तेल घालून आपण दक्ष राहिला हवं. लहान मुलांकडे तर विशेष लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

अन् एका क्षणात…

या व्हिडीओमध्ये रस्त्यावर वाहनाची सतत ये जा सुरु आहे. अशातच एक चिमुकली जोरात धावत येते आणि तिला सुसाट वेगाने येणाऱ्या तीन बाइकने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर तिची आई चिमुकलीकडे धावत आली पुढे जे झालं ते पाहून तुमचं डोक चक्रावेल. 

तुम्ही लहान मुलांसोबत रस्त्याच्या आजूबाजूला लहान मुलांसोबत असेल तर अन् कुठल्या कामात व्यस्त झालात तर ही एक धोक्याची घंटा असू शकते. प्रत्येक पालकांनी या व्हिडीओमधून बोध घ्या. 

हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अचानक एक चिमुकली रस्त्या ओलांडण्यासाठी धावत येते. जशी ती चिमुकली रस्त्याच्या मधोमध पोहोचते भरधाव वेगाने येणारी एक बाइक तिला धकड देऊन जाते. त्यानंतर ती मुलगी रस्त्यावर पडते. पुढे लगेचच काही क्षणात दुसरी सुसाट वेगाने बाइक येते आणि पुन्हा त्या चिमुकलीला धडक देते. (road accident three speed bike hit child video viral on Social media Trending video google now)

देव तारी त्याला कोण मारी!

काही समजण्याच्या आत तिसरी बाइक तिला धकड देऊन जाते. चिमुकली रस्त्याकडे पळताना पाहून आई धावत ते पण काही क्षणात हे सगळं घडतं. आई चिमुकलीकडे धावत जाते आणि तिला उचलते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अपघातानंतरही चिमुकली रडत नाही तर पूर्णपणे बरी दिसतं आहे. 

हा धक्कादायक अपघात महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 6.7 दशलक्षाहून अधिक यूजर्सने पाहिला आहे. 

 

Related posts