Kolhapuri Jaggery In Crisis Farmers Shut Down Jaggery Deals In The Market Yard In Kolhapur



( प्रगत भारत । pragatbharat.com)

kolhapur Jaggery : गेल्या महिनाभरापासून गुळाचे दर घसरत चालल्याने कोल्हापूरमध्ये गुऱ्हाळघरे (Kolhapuri jaggery in crisis) अखेरची घटका मोजू लागली आहेत. गुळाला किमान हमीभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी यासाठी आज मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुळ सौदे बंद पाडले. गुळाचे दर वाढणार नाही तोपर्यंत गुळ सौदे चालू करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकच्या गुळाची होत असलेली विक्रीही यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दाखवून दिली. त्यामुळे कोल्हापूरच्या गुळाच्या नावावर फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी गुळाला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी एकमुखाने मागणी केली. गुळाचा दर घसरून 3  हजारांवर आला आहे. किमान 3700 रुपये दर मिळावा, जेणेकरून उत्पादन खर्च निघेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. एका शेतकऱ्याने व्यथा व्यक्त करतानाना सांगितले की, कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असणारी1200 गुऱ्हाळघरे 300 वर आली. त्यानंतर 180 वर येऊन पोहोचली. आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत 60 ते 65 गुऱ्हाळघरे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दर पडला आहे. 

पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ हंगाम सुरु झाल्यानंतर प्रतिक्विंटल गुळाला 5 हजार 555 किंवा 6 हजार 666 रुपये मिळाल्याचे मोठ्या रुबाबात सांगितले जाते. प्रत्यक्षात साडे तीन हजारांच्या आत दर मिळत आहे. साखर कारखान्यांकडून उसाला प्रतिटन सरासरी 3 हजार रुपयांवर दर मिळत असताना गूळ मात्र कवडीमोलाने विकला जात आहे. 

कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकातील गुळाची विक्री 

कर्नाटकमध्ये गुळाचा उत्पादन खर्च कमी असल्याने तो गूळ कोल्हापूरच्या मार्केट यार्डात कोल्हापुरी गुळाच्या नावाचे पॅकिंग करून विकला जात आहे. त्यामुळे त्याची पाहणी आज अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे ही सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कर्नाटकमध्ये 3 हजार ते 3100 रुपयांपर्यंत तयार केला जातो. त्यानंतर हाच गूळ कोल्हापूरचे लेबल आणि पॅकेजिंग करून कोल्हापूरच्या नावाने गुजरातसह बाहरेच्या राज्यांमध्ये विकला जातो. त्यामुळे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला.

Reels

  

गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय

कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ उत्पादक दर घसरल्याने चांगलाच हवालदिल झाला आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याने सोमवारी गुऱ्हाळ घरे बंद करण्याऐवजी गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. कोल्हापूरचा गूळ हा दर्जेदार आणि साखरमिश्रित नसावा, असाही निर्णय घेण्यात आला. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या

Related posts