Gurukothji Is The Village Of Sextortion Says Pune Police( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajastan Sextortion : पुण्यात दोन युवकांना सेक्सटॉर्शनमुळे (sextortion) आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणामुळे पुण्यातील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शनच्या रॅकेटचा शोध घेण्यास सुरुवात केली. या तपासात गुरुकोठडी हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील संपूर्ण गावच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं आहे. 

कसा घेतला गावाचा शोध?
पुण्यात एकाच महिन्यात सेक्सटॉर्शनने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे सेक्सटॉर्शन नेमकं काय असतं आणि ते कसं केलं जातं आणि हा प्रकार नेमका कोण करत आहे? याचा शोध पुणे पोलिसांनी सुरु केला. दोघांचा बळी गेल्यानंतर पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली. मोबाईल नंबरचं लोकेशन शोधलं. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ तालुक्यातील गुरु कोठडी असं या गावाचं नाव आहे. या गावात पोहचल्यावर पुण्यातील मुलाच्या आत्महत्येस कारण ठरलेला आरोपी अन्वर खान याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या गावातील पोलिसांनी आणि त्याच्या घरच्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपीचा अडीच किलोमीटर पाठलाग केला आणि आरोपीला पकडलं. राजस्थानमध्ये अनेक तरुण सेक्सटॉर्शनमार्फत पैशाची मागणी करतात. याचं त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण देखील घेतलं असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 

अख्खं गावच सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालवतं
झारखंडमधील जमातारा प्रमाणेच राजस्थानमधील गुरुगोठडी गाव फसवणूक आणि सेक्सटॉर्शनचा अड्डा बनल्याचं उघड झालं आहे. या गावातील सगळे गावकरी सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स तयार करुन त्या माध्यमातून सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालवत असल्याचं पुणे पोलिसांचे सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन युवकांनी सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली. या गावातील अन्वर खानने मुलीच्या नावे बनावट अकाउंट तयार करुन पुण्यातील 19 वर्षांच्या मुलाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढलं. काही दिवस विश्वास संपादित केल्यावर त्याला त्याचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणं सुरु झालं. अखेर या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली. पुण्यातील धनकवडी भागातील तरुणही असाच सेक्सटॉर्शनचा बळी ठरला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या सेक्सटॉर्शनचे मूळ शोधायचं ठरवलं आणि सेक्सटॉर्शनचा अड्डा असलेलं गाव शोधून काढलं. हे  संपुर्ण गुरुकोठडी गावच सेक्सटॉर्शनच्या धंद्यात असल्याचं आणि गावातील स्त्री-पुरुष असे मिळून एकूण अडीच हजार लोक यात सहभागी असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. 

टीसी आणि न्यायाधीश देखील सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात
पुणे पोलीस अन्वर खानला घेऊन स्थानिक न्यायालयात त्याची रिमांड घेण्यासाठी गेले होते. तिथल्या न्यायाधीशांनी धक्कादायक खुलासा केला. न्यायाधीशही याच जाळ्यात अडल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी अन्वरची ट्रान्झिट कस्टडी पुणे पोलिसांना दिली. यानंतर पुणे पोलिसांनी अन्वरचं रेल्वे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी टीसीने देखील आपण अशाप्रकारांना बळी पडल्याचं पोलिसांना सांगितलं. या दोघांनीही पुणे पोलिसांना तपास करण्यासाठी मदत केली. अन्वर खानला पुण्यात आणून पुणे पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतून आणखी नवीन माहिती समोर येणार आहे. पण सेक्सटॉर्शनचे हे प्रकार रोखण्यासाठी आंतरराज्यीय स्तरावर तपास यंत्रणांनी काम करण्याची गरज यातून अधोरेखित झाली आहे. 

Reels

Related posts