IND vs NZ Rain stops play, तिसरा टी-२० सामना पावसामुळे थांबला, मॅच रद्द झाल्यास काय होणार? वाचा काय सांगतो डकवर्थ लुईस नियम – india vs new zealand 3rd t20 match rain again stops play read what will happen if match dont restart dls rule( प्रगत भारत । pragatbharat.com)

नेपियर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा t20 सामना आज नेपियर येथे खेळवला जात आहे. आज या सामना दरम्यान पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले जात होते परंतु सामना सुरू व्हायच्या काही वेळ आधी पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे आजच्या सामन्याचा टॉस देखील उशिरा केला गेला. टॉस झाल्यानंतर देखील सामना पुन्हा थांबवण्यात आला. मग काही वेळाने सामन्याला पुन्हा सुरुवात झाली.

भारत आणि न्यूझीलंड मधील टॉस न्यूझीलंडच्या संघाने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा पहिला डाव पाऊस न येता पार पडला. परंतु दुसऱ्या डावाची ९ षटके पूण होईपर्यंत पावसाच्या हलक्या सराई येऊ लागल्या आणि षटक पूर्ण होताच पंचांनी सामना थांबवला. पावसाच्या सारी वाढल्याने सामना पुन्हा थांबवण्यात आला आहे. मैदानावर कव्हर्स टाकण्यात आली असून आता दोन्ही संघांकडून पाऊस जाण्याची वाट पहिली जात आहे.

डकवर्थ लुईस नियम

पावसामुळे भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या टी-२० सामन्याचा दुसरा भारताचा डाव ९ षटकांनंतर थांबवण्यात आला आहे. सध्या भारताची धावसंख्या ९ षटकांमध्ये ७५ धावांवर ४ विकेट आहे. तर डकवर्थ लुईस नियमानुसार दोन्ही संघांच्या धावा या घडीला समान आहेत. पाऊस असाच सुरु राहिला आणि सामना पुन्हा खेळवण्याची परिस्थिती नसल्यास हा सामना टाय म्हणून घोषित करण्यात येईल. सामना टाय झाल्यास भारत ही मालिका १-० अशा फरकाने जिंकणार आहे. त्यामुळे पाऊस आता काय करणार यावर सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

Related posts