Mohammad Siraj bowling in 3rd t20 match, टी-२० विश्वचषकात रोहितने नेटमध्ये गोलंदाजी करून घेतली, आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उडवला किवींचा धुव्वा – mohamad siraj dont get a chance in playing of t20 and now took 4 wickets in ind vs nz 3rd t20 match( प्रगत भारत । pragatbharat.com)

नेपियर: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका भारताने १-० अशा फरकाने जिंकली आहे. टी-२० विश्वचषकानंतर संघासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरली आहे. आजच्या सामन्यातही पावसाने आपली उपस्थिती दर्शवली. आजच्या सामन्यात देखील भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मधल्या काही काळात न्यूझीलंडच्या फलंदाजी जोडीने भारतावर दबाव निर्माण केला पण भारताच्या या वेगवान गोलंदाजाने त्यांची जोडी तोडत भारतीय संघाला कमबॅक करून दिले.

हा गोलंदाज म्हणजे मोहम्मद सिराज. सिराजला आजच्या सामनावीर देखील घोषित करण्यात आले. मोहम्मद सिराजचा गेल्या काही मालिकांपासून भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळत नव्हती. २०२२ च्या टी-२० विश्वचषकातही मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली होती, पण तिथे त्याला फक्त नेटमध्ये गोलंदाजी करायला लावली होती. मात्र, न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सिराजला सलग दोन सामने खेळण्याची संधी मिळाली.

वाचा: पहिली आणि शेवटची मॅच पावसाला, तरीही टी-२० मालिकेची ट्रॉफी भारताला, पाहा नेमकं काय घडलं

या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. विशेषत: तिसऱ्या टी-२० मध्ये त्याने असा कहर केला की न्यूझीलंड संघाला सावरता आले नाही.

मोहम्मद सिराजने तिसऱ्या टी-२० मध्ये चार षटकांच्या गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने केवळ १७ धावा दिल्या. या सामन्यात मार्क चॅपमन हा सिराजचा पहिला बळी ठरला. सिराजने चॅपमनला अर्शदीप सिंगकरवी झेलबाद केले.

हेही वाचा: VIDEO: ना बोल्ड, ना रनआऊट, ना कॅच…तरीही आऊट झाला श्रेयस अय्यर! पाहा नेमकं झालं

या स्पेलमध्ये सिराजने ५४ धावांची खेळी खेळून भारतासाठी धोकादायक ठरणाऱ्या फलंदाजाची दुसरी विकेट मिळवली. तो दुसरा कोणी नसून ग्लेन फिलिप्स होता. फिलिप्सला सिराजने भुवनेश्वर कुमारच्या हाती झेलबाद केले. त्याचवेळी सिराजला जेम्स नीशमची तिसरी विकेट मिळाली तर मिशेल सँटनरच्या रूपाने सिराजला चौथी विकेट मिळाली.

न्यूझीलंडविरुद्ध सिराजचा सर्वोत्तम स्पेल

या शानदार गोलंदाजीमुळे मोहम्मद सिराज न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. या सामन्यात सिराजने ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १७ धाव देत ४ बळी आपल्या नावावर केले. सिराजच्या आधी पटेलने किवी संघाविरुद्ध अनेकदा किफायतशीर गोलंदाजी केली आहे. अक्षरने २०२१ साली कोलकातामध्ये झालेल्या टी-२० सामन्यामध्ये केवळ ९ धावा देऊन तीन बळी घेतले होते.

वाचा: … यालाच म्हणतात संधीचं सोनं… दीपक हुडाने न्यूझीलंडमध्ये रचला इतिहास, ठरला पहिलाच

तर दीपक हुडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हुडाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा सुफडा साफ केला होता. दुसऱ्या टी-२० सामन्यात दीपक हुडाने आपल्या ४ षटकांमध्ये केवळ १० धावा देत ४ मोठ्या विकेट घेतल्या.

या सामन्यात न्यूझीलंडने १६० धावा केल्या होत्या. भारतीय संघाच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाने सामन्यात १९.४ षटकात १६० धावा केल्या होत्या. या सामन्यात किवी संघाकडून डेव्हॉन कॉनवेने ५९ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय ग्लेन फिलिप्सनेही ५४ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज वेगवान धावा करून टीम इंडियासाठी धोकादायक ठरत होते पण अर्धशतकानंतर त्यांना डाव पुढे नेता आला नाही.

Related posts