Swabhimani Students Council Aggressive Over DKTE Exam Policy In Ichalkaranji Kolhapur( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील डीकेटीई इचलकरंजी येथील महाविद्यालयात दीडशेहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. याबाबत स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आज शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरभ शेट्टी यांनी आंदोलन केले. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याची बाजू समजावून घेतली. 

दरम्यान, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनानंतर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने स्वायत्त शिक्षण संस्थांचा संबंध थेट युजीसी सोबत असल्याने यासंदर्भात माहिती घेऊन डीकेटीई महाविद्यालयास पत्र पाठवण्याची आश्वासन दिले. मात्र, सर्वस्वी निर्णय त्या स्वायत्त महाविद्यालयाचा असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. त्यामुळे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून डीकेटीई या महाविद्यालयाच्या बाहेर निकाल लागेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सौरभ शेट्टी यांनी घेतला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील डिकेटीई शिक्षण संस्था स्वायत्त आहे. त्यामुळे या संस्थेतंर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा महाविद्यालयातंर्गत घेतल्या जातात. संस्था स्वायत्त असल्याने जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीनवेळा परीक्षा देण्याची परवानगी असते. परंतु, डिकेटीई तीनवेळा परीक्षा घेत नसल्याने विद्यार्थी नापास होऊन वर्षही वाया जात आहे. यावेळी विनय पाटील, रोहित पुदाले, अण्णा सुतार, यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

Reels

Related posts