Extra Marital Affair : शारीरिक संबंध ठेवताना तांत्रिकांने दोघांच्या गुप्तांगावर 50 फेविक्विक ओतून… अंगावर काटा आणणारी घटना!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Extra Marital Affair : देशभरात एक्स्ट्रा मॅरीटेअल अफेयरच्या (Extra Marital Affair) अनेक घटना घडत असतात. अशा घटनांमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक्स्ट्रा मॅरीटेअल अफेयरची घटना समोर आली आहे. अगदी सिनेमाच्या कथानकालाही जालवेल अशी ही घटना आहे. या घटनेत प्रेम, सेक्स, ड्रामा आणि क्राईम अशा सर्व गोष्टी आहे. या घटनेचा घटनाक्रम एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.  

हत्येची घटना काय?

या घटनेत 18 नोव्हेंबर रोजी एका जंगलात तरूणाचा आणि महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला होता. यामध्ये मृतदेहामध्ये तरूणाचा प्रायवेट पार्ट (private part) कापला गेला होता तर तरूणीच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या मृत तरूणाचे नाव राहूल मीना (वय 30) असे होते, तो पेशाने शिक्षक होता, तर महिलेचे नाव सोनू कुंवर (वय 28) असे होते. या घटनेतील हत्याकांड पाहुन पोलिसांना ऑनर किलिंगचा संशय आला होता. मात्र तपासाअंती काही वेगळेच समोर आले आहे. 

अनैतिक संबंध 

सोनू आणि राहुलचे नातेवाईक भादवी गुडा येथील इच्छापूर्ण शेषनाग भावजी मंदिरात यायचे-जायचे. याच ठिकाणी राहुल आणि सोनूची ओळख झाली होती. या दोघांचे आधीच लग्न झाले होते. मात्र त्यांच्यात मैत्री होती. या मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले होते. आणि मग नंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध (Extra Marital Affair) सुरु झाले. 

घटनेत तांत्रिकाची एन्ट्री 

सोनु आणि राहूलमध्ये अनैतिक संबंध (Extra Marital Affair) सुरु झाले होते. या अनैतिक संबंधाची माहिती राहूलच्या पत्नीला लागली होती. त्यामुळे सोनुवरून राहूल आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे.सततच्या या भांडणामुळे त्यांचा संसार विस्कळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्यामुळे या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी राहूलच्या पत्नीने तांत्रिक भालेशची मदत घेतली होती. पत्नीने तांत्रिक भालेशला राहूलच्या अनैतिक संबंधाची सर्व माहिती सांगितली होती.  

तांत्रिकाला दिली धमकी

पत्नीने तांत्रिकाला अनैतिक संबंधाबाबत (Extra Marital Affair) सर्व माहिती दिल्याचे राहूलला कळताच तो वैतागला. तसेच तो तांत्रिक सोनूशीही जवळीक वाढवत असल्याचे राहूलच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे राहूल आणि सोनूने त्याला बदनाम करण्याची धमकी दिली. एका फटक्यात आपले नाव आणि प्रतिष्ठा खराब होण्याच्या भीतीने तांत्रिक घाबरला आणि त्याने दोघांच्या हत्येचा कट रचला. 

50 फेविक्विकने कसा रचला हत्येचा कट 

बदनामीच्या भीतीपाई तांत्रिक भालेशने सोनु आणि राहूलच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्याने बाजारातून 50 फेविक्विक विकत घेऊन बाटलीत भरले. यानंतर 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुल आणि सोनूला सुखडिया सर्कलमध्ये बोलावले. या परिसरात असलेल्या जंगलातील एका निर्जनस्थळी त्यांना नेऊन त्यांना कपडे काढून सेक्स करायला भाग पाडले. 

राहूल आणि सोनू सेक्स करत असताना अचानक तांत्रिकाने फेविक्विकची बॉटल काढत दोघांच्या प्रायवेट पार्टवर ओतली. यामुळे दोघेही एकमेकांना घट्ट चिकटूनच राहिले. दोघेही स्वत:ला वेगळ करायचा प्रयत्न करत होते, मात्र दोघांची त्वचा सोलायला लागली. यानंतर तांत्रिक भालेश याने दोघांवर चाकू व दगडाने वार करून जखमी केले. राहूलचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापून वेगळा केला. तर सोनूच्या प्रायव्हेट पार्टवरही चाकुने हल्ला केला. दोघांची अशाप्रकारे हत्या केल्यानंतर तांत्रिकाने घटनास्थळावरून पळ काढला होता.  

नग्न अवस्थेत का मारले ? 

दोघांना नग्न अवस्थेत ठार मारण्याचा हाच उद्देश होता की, जेणेकरून जेव्हा त्यांचे मृतदेह लोकांना सापडतील तेव्हा ते आक्षेपार्ह अवस्थेत असतील आणि ते या प्रकरणातून सहज सुटू शकतील. तसेच ही घटना खुनाची नसून दोन जातीतील भांडणामुळे झाल्याचा पोलिसांना संशय वाटेल आणि त्यांच्यावर कोणाचा संशय येणार नाही.  

पोलिसांकडून 72 तासांत हत्येचा उलगडा

दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेचच मृतदेहाची ओळख पटवून तपासाला सुरुवात केली. उदयपूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) विकास कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. परिसरातील सुमारे 50 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जवळून पाहिले. यासोबतच सुमारे 200 जणांची चौकशी केली आहे. 

या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे 55 वर्षीय तांत्रिक भालेश कुमार संशयास्पद वाटला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी 72 तासांत या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणात आता तांत्रिकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजस्थानमधील (Rajsthan) उदयपूरमधील केलाबावाडीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलं आहे. 

Related posts