hyderabad accident news, रोड क्रॉस करताना दोन महिला पत्रकारांना कारने उडवलं; व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, एकीचा जागीच मृत्यू – young women were run over by cars while crossing the road video caught on cctv one died on the spot( प्रगत भारत । pragatbharat.com)

Accident News : हैदराबादच्या हयातनगर परिसरात अशाच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यात एका कारने दोन तरुणींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुसरी तरुणी गंभीर जखमी आहे.

 

रोड क्रॉस करताना तरुणींना कारने उडवलं; व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, एकीचा जागीच मृत्यू
हैदराबाद : हैदराबादच्या हयातनगर परिसरात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यात एका कारने दोन तरुणींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुसरी तरुणी गंभीर जखमी आहे.

या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव निवेदिता सूरज असं आहे. निवेदिता या शनिवारी सकाळी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून ऑफिसला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. यावेळी एलबी नगरच्या बाजूने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. निवेदिता यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर कार चालक तात्काळ फरार झाला. धडक बसल्याने कार दुभाजकाला धडकली आणि विरुद्ध दिशेने जाऊन पडली. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून हयातनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Aurangabad News: गोडेतेलाचा टँकर पलटी; किटली, बादल्या, डबे घेऊन गावकऱ्यांची झुंबड
निवेदिता सूरज या हैदराबादमधील ETV Bharat या संस्थेत कंटेन्ट एडिटर म्हणून काम करत होत्या. २०२१मध्ये ते ETV Bharatमध्ये रुजू झाल्या होत्या. निवेदिता यांच्यावर इरिंगलाकुडा त्रिशूर जिल्ह्यातील तिच्या विरुथीपारंबिल निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंत्र्याच्या मुलाने जे केलंय त्याने शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या पायावर पडून रडण्याची वेळ आलीय

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Related posts