Manchester United terminated Cristiano Ronaldo, विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यापूर्वीच रोनाल्डोला मोठा धक्का, आता थेट संघाबाहेर – a big blow to cristiano ronaldo before the start of the world cup, it was a bad time to remove him from the team( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यापूर्वी आता दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा धक्का बसला आहे. कारण FIFA World Cup मधील पहिला सामना खेळण्यापूर्वीच आता रोनाल्डोला संघात कायम ठेवण्यात आलेले नाही.

रोनाल्डो या विश्वचषकात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. पण आता यापुढे तो मँचेस्टर युनायटेडच्या संघात कायम राहणार नाही. कारण आता रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडबरोबर असलेला करार संपुष्टात आला आहे. रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेडने आता करारमुक्त केले आहे. पण मँचेस्टर युनायटेडने हा निर्णय तात्काळ जाहीर केला असून त्याची अंबलबजावणीही केली आहे.

मँचेस्टर युनायटेडच्या संघाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आता आमच्या संघाचा भाग नसेल. हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे, पण त्याचबरोबर या निर्णयाची माहिती आम्ही रोनाल्डोला दिली आहे आणि त्यालाही ही गोष्ट मान्य आहे. “

या विश्वचषकात रोनाल्डो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण यानंतर रोनाल्डो विश्वचषक खेळणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. कारण यापुढे चार वर्षे तो देशाकडून खेळणार की नाही, हे अजूनही सांगता येत नाही. रोनाल्डो हा जास्त क्लबकडून फुटबॉलचे सामने खेळत असतो आणि मँचेस्टर युनायटेड हा फुटबॉल विश्वातील एक दिग्गज संघ आहे. त्यामुळे रोनाल्डोसाठी हा एक मोठा धक्का असेल. गेल्या काही दिवसांत रोनाल्डोचे वागणे बदलले होते, असे म्हटले जात होते आणि या गोष्टीचाच फटका त्याला बसला आहे, असे म्हटले जात आहे. एकिकडे कतारमध्ये विश्वचषक नुकताच सुरु झाला आहे. रोनाल्डोच्या पोर्तुलागचा आतापर्यंत एकही सामना झालेला नाही. त्यामुळे मँचेस्टर युनायटेडच्या या मोठ्या निर्णयाचा रोनाल्डोवर नेमका काय परीणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असेल. या निर्णयानंतर रोनाल्डो जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील.

Related posts