Maharashtra News live Updates maharashtra marathi news breaking news live updates 23 November 2022 Wednesday today marathi headlines political news mumbai news national politics news maharashtra live updates marathi news live updates( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे बुधवारी बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादव यांची घेणार भेट

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित राहतील. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट दुपारी 3 वाजता होणार आहे. पक्षाने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र महाविकास आघाडीचा प्रयोग करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केली होती. मात्र शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आणि मविआ सरकार कोसळे. याच्याच काही दिवसानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबत हातमिळवणी केली आणि नवीन सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट मुंबईच्या येत्या महानगरपालिका निवडणुकीवर परिणामकारक ठरू शकते, अशी चर्चा आहे. याच कारण म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक राहतात. मुंबईच्या पालिकेच्या अनेक जागांवर त्यांचं मत हे परिणामकारक ठरू शकतं. 

Nashik Crime : नाशिकमधून मोठी बातमी; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील चिमुकल्याची हत्या, पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Nashik Crime News) रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमातून (Aadhartirth Aashram) धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना उघडकीस 
नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना अंजनेरी गावाजवळ असलेल्या एका अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आधारतीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. या आश्रमातील एका चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

Ronaldo Manchester United Exit : मोठी बातमी! रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे रस्ते वेगवेगळे, क्लबकडून अधिकृत घोषणा

एकीकडे फुटबॉलचा महासंग्राम फिफा विश्वचषक (Fifa World Cup 2022) सुरु असताना फुटबॉल जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबपासून वेगळा झाला आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं क्लबनं सांगितलं आहे. मँचेस्टर युनायटेडनं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन हे ट्वीट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोने एका मुलाखतीत क्लबवर खासकरुन क्लबचे मॅनेजर एरिक यांच्यावर आरोप केले होते, ज्याचे पडसाद आता उमटल्याचं दिसून येत आहे.

क्लबने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड परस्पर कराराने हा निर्णय घेत असून तात्काळ रोनाल्डो क्लबपासून वेगळा होत आहे. तसंच क्लबमध्ये त्याच्या दोन्ही कारकिर्दीबद्दल आम्ही आभार मानतो. त्याने क्लबकडून 346 सामन्यांम्ध्ये 145 गोल केल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तसंच मँचेस्टर युनायटेडमधील प्रत्येकजण एरिक टेन हॅगच्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती सुरू ठेवण्यावर आणि संघाला आणखी यश मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

Related posts