Breast Cancer च्या लास्ट स्टेजमध्ये किती दिवस जगतात महिला? भारतातील अवस्था अतिशय बेकार – how many days do women live in the last stage of breast cancer know breast cancer survival rate in india( प्रगत भारत । pragatbharat.com)

स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. महिलांना सर्वात जास्त त्वचेचा कर्करोग होतो. स्तनाचा कर्करोग जेव्हा चौथ्या किंवा शेवटच्या टप्प्यात पोहोचतो तेव्हा तो जीवघेणा ठरतो. शेवटच्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाला मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग म्हणतात. जे स्त्रियांना आणि पुरुषांना खूप कमी आयुष्य मिळतं.

मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग म्हणजे काय? सीडीसीच्या मते, स्तनाचा कर्करोग हा कर्करोग आहे जो स्तनाच्या पेशींमध्ये होतो. जेव्हा या कर्करोगाच्या पेशी स्तनाबाहेर फुफ्फुस, लिम्फ नोड्स यांसारख्या इतर अवयवांमध्ये पसरू लागतात तेव्हा त्याला मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग म्हणतात. काखेत किंवा स्तनात गाढ येणे, स्तनाला सूज येणे, दुखणे, स्तनाग्र आतून दाबणे, आकार बदलणे यासारख्या समस्या स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे मानली जातात. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​ब्रेस्ट कॅन्सरपासून पुरूषही सुटलेले नाही

केवळ महिलांनाच स्तनाचा कर्करोग होत नाही, तर पुरुषही त्याचे बळी ठरू शकतात. CDC म्हणते की यूएस मध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या प्रत्येक 100 प्रकरणांपैकी 1 पुरुषांमध्ये होतो. त्यामुळे पुरुष या प्राणघातक आजारापासून पूर्णपणे मुक्त नाहीत.

(वाचा – Control Low BP without Medicine : वर्षानुवर्षांचा बीपी या ५ सवयींने होईल एकदम गायब,औषधंही फेकून द्यावी लागतील)

​शेवटच्या टप्प्यापूर्वी जगण्याची शक्यता अधिक

स्तनाचा कर्करोग चौथ्या टप्प्यात येण्यापूर्वी जगण्याची शक्यता खूप जास्त असते. Cancer.net नुसार, जर कर्करोग स्तनाच्या पेशींपुरता मर्यादित असेल तर 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण 5 वर्षांनंतरही जिवंत असतात आणि 10 वर्षांच्या जगण्याचा दर 84 टक्के आहे.

(वाचा – Control Low BP without Medicine : वर्षानुवर्षांचा बीपी या ५ सवयींने होईल एकदम गायब,औषधंही फेकून द्यावी लागतील))

​पुरुषांमध्ये जगण्याचे प्रमाण कमी

स्तनाच्या कर्करोगाचा शेवटचा टप्पा पुरुषांसाठी अधिक घातक असल्याचे दिसून येते. कारण, स्टेज IV स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर केवळ 22 टक्के पुरुष 5 वर्षे जगतात. म्हणूनच पुरुषांनी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे हलक्यात घेऊ नयेत आणि ती दिसू लागताच डॉक्टरांना दाखवावे.

(वाचा – ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल)

​चौथ्या टप्प्यात घातक ठरते

स्तनाचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोहोचला तर तो जीवघेणा ठरतो. Cancer.net च्या दुसर्‍या अहवालानुसार, मेटास्टॅटिक स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांपैकी फक्त 29 टक्के 5 वर्षे जगतात.

(वाचा – इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी)

​भारतात परिस्थिती वाईट

एनसीबीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात स्तनाच्या कर्करोगाचे जगण्याचे प्रमाण अधिक वाईट आहे. कारण, बहुतेक प्रकरणे उशिरा समोर येतात. जागतिक कर्करोग अहवाल 2020 नुसार, स्तनाच्या कर्करोगावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लवकर ओळखणे आणि त्वरित उपचार करणे.

(वाचा – Ayushman Khurana व्हर्टिगोच्या आजाराने त्रस्त, Vertigo कमी करण्यासाठी हे उपाय येतील कामी)

​स्तनाच्या कर्करोगावर इलाज

सीडीसीच्या मते, स्तनाचा कर्करोग शेवटच्या टप्प्यापूर्वी बरा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. यासाठी डॉक्टर ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोन थेरपी आणि लक्ष्यित थेरपी वापरू शकतात.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Related posts