Railway Minister Ashwini Vaishnaw Said About 16 Lakh Jobs Being Generated By Central Government Every Month Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

Railway minister Ashwini Vaishnaw : केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख नोकऱ्यांची भरती केली जात असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. म्हणजेच दर महिन्याला 16 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. राजस्थानमधील अजमेरमध्ये सीआरपीएफने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत. ते म्हणाले की, जागतिक आर्थिक संकटाच्या काळातही भारत हा संधींनी परिपूर्ण उर्जेचा स्रोत म्हणून उदयास आला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. 

 

 

 

 

 

 Related posts