Hardik Pandya On Sanju Samson, ‘ही माझी टीम आहे…’, संजू सॅमसनला संधी न मिळाल्याच्या चर्चांवर हार्दिक पंड्या स्पष्टचं बोलला – hardik pandya on sanju samson about not getting chance in playing eleven against new zealand t20 series( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने १-० असा दणदणीत विजय मिळवला. या टी-२० मालिकेत संजू सॅमसन आणि उमरान मलिकसारखे स्टार खेळाडू अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात असतील अशी अपेक्षा होती. पण या आशा मात्र धुळीला मिळाल्या. सॅमसन आणि उमरान मलिक यांना दोन्ही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अंतिम अकरामध्ये सॅमसनचा समावेश न करण्याबाबत बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आता हार्दिक पांड्यानेही संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांसारख्या खेळाडूंच्या संघातील अनुपस्तिथीबाबत मौन सोडले आहे. या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या म्हणाला की, ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना येत्या काळात नक्कीच संधी मिळेल. बाहेर जे काही बोलले जात आहे त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही, असे हार्दिकचे मत आहे.

वाचा: टी-२० विश्वचषकात रोहितने नेटमध्ये गोलंदाजी करून घेतली, आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उडवला किवींचा धुव्वा

मी फारसा बदल करत नाही : हार्दिक

पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्या म्हणाला, ‘सर्वप्रथम बाहेरून कोण काय बोलतंय याने सध्याच्या स्थितीत काही फरक पडत नाही. हा माझा संघ आहे, प्रशिक्षक आणि मी आम्हाला जसं ठीक वाटेल आणि आम्हाला सामन्यासाठी जी बाजू आवश्यक आहे त्यांना खेळवू. खूप वेळ आहे, प्रत्येकाला संधी मिळेल आणि संधी मिळेल तेव्हा बराच काळासाठी मिळेल. जर मोठी मालिका असती, अधिक सामने झाले असते तर साहजिकच अधिक संधी मिळाल्या असत्या. ती एक छोटी मालिका होती. मी फारशा बदलांवर विश्वास ठेवत नाही आणि भविष्यातही करणार नाही.

हेही वाचा: पहिली आणि शेवटची मॅच पावसाला, तरीही टी-२० मालिकेची ट्रॉफी भारताला, पाहा

हार्दिक पांड्या म्हणतो, ‘मला जसे सहा बॉलिंगचा पर्याय हवा होता आणि ती गोष्ट या दौऱ्यात आली आहे. जसे दीपक हुडाने गोलंदाजी केली आहे. अशा फलंदाजांनीही कामगिरी करत राहिल्यास नवीन गोलंदाजांचा वापर करून विरोधी संघाला चकित करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील.’

तो पुढे म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मी गोष्टी साध्या ठेवतो. मी सामन्यात कर्णधार असो किंवा मालिकेत, मी माझ्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करेन. मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी क्रिकेट खेळलो. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा हा दुसरा टी-२० मालिका विजय आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जून महिन्यात आयर्लंडचा २-० असा पराभव केला होता.

वाचा: तिसरा टी-२० सामना पावसामुळे थांबला, मॅच रद्द झाल्यास काय होणार? वाचा काय सांगतो

ऋषभ पंतच्या बॅटमधून केवळ १७ धावा आल्या

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनऐवजी ऋषभ पंतसारख्या खेळाडूला अंतिम अकरामध्ये महत्त्व देण्यात आले, जो दोन्ही डावात फलंदाजीसह फ्लॉप ठरला. दुसऱ्या टी-२० सामन्यात पंतला केवळ सहा धावा करता आल्या. त्यानंतर नेपियरमधील शेवटच्या टी-२० सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ ११ धावा निघाल्या. सॅमसनने शेवटचा टी-२० सामना विंडीज दौऱ्यावर खेळला होता, तेव्हापासून तो संधीची वाट पाहत आहे.

हेही वाचा: VIDEO: ना बोल्ड, ना रनआऊट, ना कॅच…तरीही आऊट झाला श्रेयस अय्यर! पाहा नेमकं झालं तरी काय

संजूला केवळ २६ सामने खेळण्याची संधी मिळाली

संजूला अलीकडच्या काळात फार कमी संधी मिळाल्या आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सॅमसनला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकासाठी संजू सॅमसनपेक्षा ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले. संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१.१४ च्या सरासरीने आणि १३५.१५ च्या स्ट्राइक रेटने २९६ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, वनडेमध्ये संजूच्या ७३.५० च्या सरासरीने २९४ धावा आहेत.

Related posts