isha ambani anand piramal twins, मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीला झाली जुळी मुलं, लाल लेहंग्यात नवरीसारखी सजली ईशा अन् लाखो नजरांना केलं घायाळ.. – mukesh ambani daughter and twins mother isha ambani looked like a bride in a red sabyasachi lehenga for vastu shanti pooja( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेले अंबानी (Ambani) कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. कधी अंबानी नवीन कंपनी खरेदी करतात, तर कधी करोडो रुपयांची डील करतात. आता तर अंबानी कुटुंब एका वेगळ्या कारणामुळे बातम्यांमध्ये आहे. कारण त्यांची लाडकी मुलगी ईशा अंबानीने (Isha ambani) दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. यापैकी एक मुलगा आहे तर दुसरी मुलगी आहे. एकाचे नाव आदिया (Aadiya Piramal) ठेवले आहे तर दुसऱ्या बाळाचे नाव कृष्णा (Krishna) असे ठेवले आहे. मुकेश अंबानी हे आजोबा झाले आहेत आणि म्हणून त्यांच्या आनंदाला सुद्धा पारावार उरलेला नाही.

ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल (anand piramal) यांना तर आभाळच ठेंगणे झाले आहे. आता एवढा मोठा क्षण आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन तर होणारच ना! अंबानी आणि पिरामल दोन्ही कुटुंबे नव्या बाळांच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत. आई ईशा अंबानी तर सेलिब्रेशनमध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन जाईल यात शंकाच नाही. ईशा अंबानीकडे असलेला स्टाईल आणि फॅशनचा सेन्स या सेलिब्रेशनमध्ये नक्की दिसणार यात शंका नाही. आज आपण पाहूया ईशाचा एक अत्यंत सुंदर असाच लाल लेेहग्यांतील एक लूक! (सर्व फोटोज-@Sabyasachi इंस्टाग्राम)

लाल जोडा लूक

ईशाने कॅरी केलेला हा लूक तेव्हाचा आहे जेव्हा ईशाच्या लग्नाच्या आधी मुकेश अंबानी यांनी गृहशांतीची पूजा घरी ठेवली होती. यावेळी संपूर्ण कुटुंब हे इंडियन ट्रॅडिशनल लुक्समध्ये दिसून आले. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते ईशाच्या सुंदर लूकनेच! तिचा हा लूक येणाऱ्या काळात ती लवकरच वधू होणार आहे याचा जणू संकेत होता. ईशाने या वेळी मरून रेड कलरचा भरजरी लेहंगा परिधान केला होता. ज्यात ती खूप सुंदर दिसत होतीच, पण तिने निवडलेले हे आऊटफिट खूप सरप्राईजिंग देखील ठरले. कारण सहसा असा लूक तरुणी आपल्या वेडिंग डे ला कॅरी करतात.

(वाचा :- मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खुल्लमखुल्ला केली प्रेम व रोमांसची उधळण, पण मलायकाच्या कातील लुकनेच केलं पार घायाळ)

नजर हटतच नव्हती

पूजेसाठी ईशाने हेवी पॅनलसह एक भरजरी लेहंगा पीक केला होता. हा एक प्रकारचा थ्री पीस सेपरेट सेट्स होता ज्यामध्ये मोनोटोन पॅटर्न असणाऱ्या चोळीसोबत मॅचिंग ओढणी आणि ए-लाईक स्कर्ट दिला होता. हे सुंदर अटायर तयार करण्यासाठी पूर्णपणे सिल्क-शिफॉन, जाळीदार कॅनवास साटनसारख्या मिक्स फॅब्रिकचा वापर केला गेला होता. मुख्य म्हणजे सजावट पूर्णपणे हाताने केली होती. ओव्हरऑल आऊटफिटमध्ये सोन्याच्या तारांसोबत जरदोजीची कशीदाकारी विणकाम केलेले दिसून येत होते.

(वाचा :- डीप गळ्याचा सेक्सी ब्लाउज परिधान करुन अवॉर्ड घ्यायला गेली जान्हवी कपूर, लोक बसले केसांपासून नखापर्यंत न्याहाळत)

चोली आणि दुपट्टा ठरला आकर्षक

ईशाने जो लेहंगा आपल्यासाठी निवडला होता तो भारतातील प्रसिद्ध फॅशन डिजाईनर सब्यसाचीने डिजाईन केला होता. हे आऊटफिट डिजाईनरच्या इंडिया रिवाईवल प्रोजेक्टचा भाग होता. त्यामुळे हे आऊटफिट सुंदर बनवण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. ओव्हरऑल अटायर कस्टम हॅन्ड पेंटेड स्टाईलमध्ये होता. ज्यासह पेअर केला गेलेला अँटिक बंधेज दुपट्टा सुद्धा खूप सुंदर दिसत होता. शिवाय लेहंग्याप्रमाणेच ब्लाउजवर सुद्धा मॅचिंग एम्ब्रॉयडरी केली होती. ज्यात डीप नेकलाईनसह स्लीवस रेग्युलर लूकमध्ये ठेवले होते. चोळीचा पॅटर्न क्रॉप लूक मध्ये होता. ज्यासह त्यांनी आपल्या दुपट्टाला ट्विस्ट लूक देऊन टीमअप केले होते.

(वाचा :- टाइट फिटिंग ड्रेस घालून नोरा फतेहीने जसा दाखवला बोल्ड अवतार, चाहता म्हणाला, “ऊफ… बॉम्ब दिसतीयेस गं..!”)

असा केला लूक कम्प्लिट

आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी ईशाने हेवी ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कॅरी केली होती. ज्यामध्ये गळ्याला कव्हर करताना गोल्ड स्टडिड चोकर नेकपीस, मॅचिंग ड्रॉपडाऊन झुमके आणि डोक्यावर याच ज्वेलरीला मॅच करणारी लाईट वेट बिंदिया लावली होती. शिवाय ईशाने आपल्या दोन्ही हातांमध्ये सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या होत्या. ज्या तिच्या ओव्हरऑल लूकला बॅलन्स सेट करताना दिसल्या. ईशाची ज्वेलरी देखील सब्यसाचीनेच डिजाईन केली होती जी 22 कॅरेटसह गोल्ड आणि पन्ना रत्नमध्ये तयार केली होती.

(वाचा :- हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादने पायावर सेक्सी स्लिट कट ड्रेसमध्ये केलं क्लिन बोल्ड, मलायकावरही पडली भारी..!)

असा होता मेकअप

ईशाला स्वतःला स्टाईल आणि फॅशनची उत्तम जाण असल्याने ती आपला मेकअप आपल्या लूकला साजेसा असाच ठेवते. या लूकमध्ये मेकअपसाठी ईशाने न्यूड टोन फाउंडेशनसह चमचमता शिमर आयशॅडो, बेसिक आयलायनर, स्मोकि आईज, डार्क लिपस्टिक लावली होती. ज्यासोबत केसांना बाउन्सी लूक देताना मिडल पार्टेड स्टाईलमध्ये मोकळे सोडले होते. एकंदर इशाचा हा लूक तिच्या आजवरच्या लूकपैकी एक बेस्ट आणि व्हायरल ठरला.

(वाचा :- 24 वर्षाआधी अरबाज खानसोबत विवाहबद्ध होताना परी दिसत होती मलायका अरोरा, अर्जुन कपूरची नवरी बनताना असा लुक असणार?)

Related posts