Pune Crime News The Men Beat The Policewoman( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news: पुण्यात पोलिसांना (Pune Crime) मारहाण करण्याचं (Police) सत्र संपत नसल्याचं चित्र आहे. कार्तिकी एकादशीसाठी बंदोबस्त करत असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त रस्ता बंद असल्याचं महिला पोलीस दोघांना सांगत होत्या. त्यावेळी दोन जणांनी भरगर्दीत त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 40 वर्षीय महिला पोलिसाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण जैन आणि दत्तात्रय कोकरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. 40 वर्षीय महिला पोलीस कार्तिकी एकादशीनिमित्त बंदोबस्त करत होत्या. एकादशीला प्रचंड गर्दी असल्याने दरवर्षी काही रस्ते बंद करण्यात येतात. देहू फाटा चौकातून आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाणारा रस्ता यात्रेमुळे बंद करण्यात आला होता. या मार्गावर कोणत्याही वाहनाला प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती. दरवर्षी लाखो भाविक आळंदीत दाखल होतात. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो.

याचदरम्यान दोन दुचाकीस्वारांनी बंद करण्यात आलेल्या रस्त्यावरुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्याने वाद घालत होते. हा वाद टोकाला गेला आणि दोघांनी महिला पोलिसाच्या तोंडावर फटका मारला. या महिला पोलिसाला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील दोघांनी मारहाण केली. अखेर नागरिक या वादात पडले आणि आरोपी असलेल्या दोघांना मारहाण केली. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांची गाडी झाडाला धडकली आणि नागरिकांनी आरोपी दोघांना पोलिसांच्या हवाली केले. 

अलका टॉकिज परिसरात महिला पोलिसाला मारहाण

News Reels

चार दिवसांपूर्वीच अलका टॉकिज चौकात असाच प्रकार घडला होता. अश्लील शिवीगाळ करुन महिला पोलिसाला चपलेने मारहाण करण्यात आली होती. माझी गाडी का उचलली, याचा जाब विचारत त्या महिला पोलिसाला महिलेनेच जबर मारहाण केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. महिला पोलिसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आली होती. सीता रमेश पुजारी (वय 35 वर्षे, रा. ताडीवाला रोड) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली होती. अलका टॉकिज परिसरात हा प्रकार घडला आहे. माझी गाडी का उचलली असा जाब त्या महिलेने पोलीस महिलेला विचारला होता. त्यावेळी पोलीस महिलेने माझी पोस्टिंग या परिसरात नाही त्यामुळे मला याबाबत माहिती नाही,” असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे महिला पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केली होती.

Related posts