wife killed husband with boyfriend, प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मग तिथेच बसून खीर-पुरी खाल्ली, करवा चौथचा उपवासही ठेवला, पण.. – wife took husbands life with the help of lover and throw him in canal and kept it secrete for six months bharatpur rajasthan( प्रगत भारत । pragatbharat.com)

भरतपूर: राजस्थानच्या भरतपूर येथे एका पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर या महिलेने पोलिसांपुढे जो जबाब दिलाय, त्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की २९ मे २०२२ रोजी रीमा नावाच्या या महिलेने प्रियकर भागेंद्र याच्यासोबत मिळून पतीची हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव पवन असल्याची माहिती आहे.

हत्या केल्यानंतर त्यांनी पवनचा मृतदेह पलंगावर ठेवला. त्यानंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन पूरी, भाजी आणि खीर बनवली. त्यानंतर भागेंद्रसोबत तिने जेवण केलं. त्यानंतर रात्री त्यांनी पवनचा मृतदेह कालव्यात फेकला.

रीमाने ६ महिने पतीच्या हत्येची घटना लपवून ठेवली होती. कुणाला संशय येऊ नये म्हणून रीमाने १३ ऑक्टोबरला पवनसाठी करवा चौथचा उपवासही ठेवला. संशयावरून पवनच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली तेव्हा ही बाब उघडकीस आली.

हेही वाचा-Shraddha Walkar Case Big Update: श्रद्धा वालकर प्रकरणी मोठी अपडेट, आफताबची कोर्टात कबुली, म्हणाला – जे झालं ते रागाच्या भरात

४ जून २०२२ रोजी पवनचे वडील हरिप्रसाद यांनी चिकसाणा पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीस आणि कुटुंबीय पवनचा शोध घेत होते. मात्र, त्याचा कुठेही थांगपत्ती लागला नाही. दरम्यान, १६ ऑक्टोबरच्या रात्री सासरच्यांनी सुनेला प्रियकरासह रंगेहात पकडले. संशयाच्या आधारे सासरच्या मंडळींनी सून आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी पवनची पत्नी रीमा आणि तिचा प्रियकर भागेंद्र यांना संशयाच्या आधारे अटक केली. चौकशीत रीमाने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला कालव्याजवळ नेले. त्यानंतर मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथे पोलिसांना मृत पवनची पँट, आधारकार्ड आणि काही हाडं सापडली आहेत.

हेही वाचा-कंगाल पाकिस्तानला लुटलं अन् आर्मी जनरलची सून रातोरात अब्जाधीश, देशात एकच खळबळ…

दोन मुलांची आई

पोलिसांच्या चौकशीत रीमाने हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. ती कानपूरची रहिवासी आहे. ३ जून २०१५ रोजी तिचे नौह गावातील पवनसोबत लग्न झाले. दोघांना लग्नानंतर एक मुलगा आणि मुलगी झाली. ज्यांचे वय ६ आणि ४ वर्षे आहे. पवन शर्मा गावातच दुकान चालवायचा. रीमाने सांगितले की, याचदरम्यान तिचे शेजारी राहणाऱ्या २७ वर्षीय भागेंद्र उर्फ भोला याच्यावर प्रेम जडलं. दोघांमध्ये लग्नबाह्य संबंध सुरुच होते.

त्यानंतर २९ मेच्या रात्री ती प्रियकर भागेंद्रसोबत पळून जात असताना पवनने दोघांना रंगेहाथ पकडले. यानंतर तिने प्रियकरासह पतीची हत्या केली. रीमाने पवनचा मृतदेह बेडवर ठेवला आणि किचनमध्ये जाऊन जेवणासाठी पुरी-भाजी आणि खीर केली. त्यानंतर भगेंद्रसोबत जेवण करून रात्रीच मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला.

पतीची हत्या सर्वांपासून लपवून ठेवली. पवन आता या जगात नाही हे तिने आपल्या सासरच्यांनाही कळू दिले नाही. पवन बेपत्ता झाला असावा असे लोकांना वाटू लागले. त्यामुळे सासरच्यांनी ४ जून रोजी पवन बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. रीमाने सांगितले की, ती नेहमी मंगळसूत्र घालायची आणि भांगेत कुंकू भरायची, जेणेकरून लोक तिच्यावर कधीच संशय घेणार नाहीत. १३ ऑक्टोबरला तिने पवनसाठी करवा चौथचा उपवासही ठेवला होता. भरतपूरचे पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे.

आईने शिकवलेल्या कलेने तिने कुटुंबाला तारलं; नेटाने संसार केला अन् देशात नाव कमावलं

Related posts