या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, sudha murthy यांनी दिला गुरुमंत्र( प्रगत भारत । pragatbharat.com)

Relationship Tips : आयुष्यात लग्न झाल्यावर अनेक गोष्टी बदलतात. एखाद्या नव्या व्यक्तीला आयुष्यात जागा देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नाते जपण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अशात जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली नसेल तर आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो.पण नातं जपण्याचा प्रयत्न करत नाही. आजकालची नाती एवढी लवकर का मोडतात या प्रश्नाचे उत्तरे लेखिका सुधा मूर्ती यांनी एका मुलाखती दरम्यान दिली आहेत. त्यांच्या मते अवास्तवी अपेक्षा ठेवल्याने नाती फार काळासाठी टिकत नाहीत. एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची संकल्पनाच बदल्यामुळे ही गोष्ट होत असावी असं त्यांचं मतं आहे. आपल्या प्रियकराने आपल्या सर्व गोष्ट गोष्टी ऐकाव्यात त्याच प्रमाणे नेहमी आपल्यासोबत राहावे आपलाच विचार करावा असे विचार असल्याने आज कालची नाती फार काळ टिकताना दिसत नाही. यासाठीच समाजसेविका सुधा मूर्ती यांनी अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमचे आयुष्य सुखमय होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयता कोणत्या आहेत त्या गोष्टी.(फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

या गोष्टी आयुष्यात कराच

लग्नाचा अर्थच असा असतो की जेव्हा दोन आयुष्य एक होतात. अशात दोन परिवार एक होतात. आपण जेव्हा कोणासोबत लग्न करतो तेव्हा आपण त्याव्यक्तीच्या संपूर्ण परिवारासोबत आपले आयुष्य पाहातो. एकमेकांना सांभाळू घेणे त्याच प्रमाणे एकमेकांच्या चुका समजून सांगणे यासर्व गोष्टींचा समावेश असतो. कधी कधी स्वत:ला विसरुन अनेक गोष्टी कराव्या लागतात अशात समाजसेविका सुधा मूर्ती सांगतात की जर तुम्ही या गोष्टी पाळल्यात तर तुमचे आयुष्य सुखकर होऊ शकते.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

​आयुष्यात जास्त चिंता करु नका

जरी तुमचे लग्न झाले असेल तरी तुमच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. जास्त चिंता करु नका. ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणाच आहेत. त्यामुळे आयुष्यात झालेल्या गोष्टींचा जास्त विचार करु नका. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

​जास्त अपेक्षा करु नका

आयुष्यात तुमच्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करु नका. त्याच्यावर जास्त अवलंबून राहू नका. जर तुम्ही असे केले तर त्याचा तुम्हालाच खूपच त्रास होईल. त्या सांगतात लग्न झाल्यावर माझं घर असेल असं देखील मला कधी वाटलं नव्हतं. भाड्याच्या घरात राहायची देखील माझी ताकत होती. तुमचा जोडीदार काम करतो की नाही या गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ नये. (वाचा :- नवऱ्याची बहारदार इनिंग, बायकोला आभाळ ठेंगणं, इमोशनल पोस्ट करत म्हणाली, ‘वामिकाला कधीतरी कळेल…’)

​आयुष्यात मोठ करायचं असेल तर छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा

जर तुम्हाला आयुष्यात फार काही मोठं करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करणे गरजेच आहे. मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्या. (वाचा :- नवऱ्याची बहारदार इनिंग, बायकोला आभाळ ठेंगणं, इमोशनल पोस्ट करत म्हणाली, ‘वामिकाला कधीतरी कळेल…’)

​कोणासोबत तुलना करु नका

आयुष्यात कधीच कोणसोबत तुलना करु नका. यामुळे तुम्हालाच त्रास होईल. तुमच्या पतीची तुलना इतर पुरुषांसोबत करु नका. तो जसा आहे त्याला तसं स्विकारा. इतर महिलांचे पती घरी लवकर येतो म्हणून तुमच्या पतीकडून अशी अपेक्षा करु नका. यामुळे तुमचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल. (वाचा :- कशी पडली Suryakumar Yadav ची विकेट, अशी आहे लव्हस्टोरी, नाते घट्ट करण्यासाठी या ५ गोष्टी जाणून घ्यायला हव्यात)

​प्रत्येक दिवशी स्वत:पेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करा

आयुष्यात प्रत्येक गोष्टीत स्वत:पेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करा. काल आपण कसं आणि कुठे होतो कालपेक्षा आज आपल्यामध्ये किती प्रगती झाली आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. (वाचा :- प्रत्येक मॅचमध्ये हे खास काम करते सुर्यकुमारची पत्नी देविशा, हेच आहे त्याच्या यशाच रहस्य)

Related posts